नवी मुंबई : भारतातून रत्न आणि दागिन्यांची सर्वाधिक निर्यात होते, त्यामुळे या उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. नवी मुंबईत उभारण्यात येणारे इंडिया ज्वेलरी पार्क हे देशाच्या विकासाला दिशा देणारे ठरणार आहे. यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक लाख रोजगार उपलब्ध होतील. त्यामुळेहे पार्क अत्याधुनिक हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.केंद्र सरकारच्या सहकार्यातून भारतातील ज्वेलरी उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या पुढाकाराने महापे एमआयडीसीत इंडिया ज्वेलरी पार्क उभारण्यात येणार आहे. सुमारे २१ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या पार्कचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.जेम व ज्वेलरीला विदेशात चांगली मागणी आहे, त्यामुळे या उद्योगाचा अधिकाधिक विस्तार झाला पाहिजे. या ज्वेलरी पार्कसाठी सरकारतर्फे सर्व सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.भारतातील ज्वेलरी उद्योगाचा देशाच्या विकासदरात सात टक्के इतका वाटा असून, अर्थव्यवस्थेत उद्योगाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सुरेश प्रभू म्हणाले. हे ज्वेलरी पार्क एकात्मिक इंडस्ट्रियल पार्क असून, येथे एकाच छताखाली उद्योगाला पूरक सुविधा उपलब्ध असतील, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, जीजेईपीसीचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल उपस्थित होते. समन्वयक किरीट भन्साळी यांनी आभार मानले.>प्रकल्पासाठी १४,४६७ कोटींचा खर्च येणारप्रमोद कुमार अग्रवाल यांनी प्रस्तावित ज्वेलरी पार्कबाबत माहिती दिली. या पार्कमध्ये देश-विदेशातून मोठी गुंतवणूक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी १४,४६७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ४१ हजार ४६८ कोटींपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्वेलरी उद्योगाला चालना देण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:22 AM