नवी मुंबई - चौथ्या रयत विज्ञान परिषदेचे उदघाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय 31 डिसेंबरपर्यंत ही परिषद चालणार आहे. रयत शिक्षण संस्था आणि होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकेकाळी आयात करणारा देश म्हणून असलेली ओळख सध्या निर्यात करणारा देश अशी झाली आहे.
येत्या काळात विज्ञानाच्या आधारे शेतीत आधुनिकता यायला हवी. जेनेरिक फूड यामुळे उत्पादन वाढले, कमी पाण्यातही उत्पादन होत आहे. इंडोनेशियामध्ये कमी पाण्यात ऊस उगवला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर शेती विषयक समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे. जगातल्या प्रत्येक तंत्रज्ञानाचे ज्ञान भावी पिढीला द्यायला हवे. शेतकरी आत्महत्या करत असल्याने उघड्यावर पडणाऱ्या कुटुंबांचे काय? विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 60 मुलांचा संपूर्ण मोफत शिक्षण रयत देत असून त्याची अमलबजावणी सुरू झाली असल्याचेही पवार यांनी सांगितले. पालक म्हणून मुलांमध्ये वैज्ञानिक आस्था वाढेल यासाठी प्रयत्न करा. बुवाबाजी प्रवृत्तीला परावृत्त केलं पाहिजे असंही ते म्हणाले. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र जगदाळे, डॉ अनिल पाटील, महापौर जयवंत सुतार, आमदार सुनील तटकरे, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.