पनवेल : पनवेलमधील याकूब बेग ट्रस्ट आणि माजी नगरसेवक सुनील बहिरा यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटे आरोप करण्यात आले असल्याचा दावा माजी नगरसेवक सुनील बहिरा यांनी केला आहे. शनिवारी पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पनवेल येथील भुखंड क्रमांक ३३९ बाबत दीर्घ मुदतीच्या भुई भाडे करारासंदर्भात हा वाद निर्माण झाला होता. मात्र संबंधित करार कायदेशीर असल्याचा दावा बहिरा यांनी केला आहे. २००९ सालापासून अस्तित्वात असणाऱ्या याकूब बेग ट्रस्टचे सगळे व्यवहार अत्यंत पारदर्शक राहिलेले आहेत. पनवेल दिवाणी कार्यालयाच्या दावा क्रमांक ३/२००२ च्या निकालनुसार सदर मिळकतीचा ताबा ट्रस्टकडे आहे. कारेकर नामक विकासकाने या भूखंड हस्तंगत करण्यासाठी नाना खटपटी केल्या आहेत. या विकासकाचे सोबत ट्रस्टचा भुईभाडे करार या पूर्वी अटी व शर्तीयांचे उल्लंघन केल्यामुळे रद्द करण्यात आला आहे. बैठकीत मुस्तफा बेग यांचे सोबत माजी नगरसेवक सुनील बहिरा, पनवेल अर्बन को.आॅप बँकेचे अध्यक्ष अजय कांडिपळे, कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष मुकुंद म्हात्रे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
न्यायप्रविष्ट प्रकरणाची नाहक बदनामी - बहिरा
By admin | Published: January 23, 2017 5:53 AM