नवी मुंबई : महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये समावेश असणाºया ज्वेल्स आॅफ नवी मुंबईची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येथील विद्युत दिव्यांची तोडफोड झाली असून हिºयासह थिंकरच्या प्रतिमेचीही तोडफोड झाल्यामुळे दोन्ही प्रतिमा हलविण्यात आल्या आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेने शहरवासीयांना रस्ते, पाणी, स्वच्छता या सुविधा उपलब्ध करून देतानाच उद्यान व इतर सुविधांवरही विशेष लक्ष दिले आहे. होल्डिंग पाँडचेही सुशोभीकरण केले जात आहे. पामबीच रोडवर नेरूळ येथील होल्डिंग पाँडचीही काही वर्षांपूर्वी दुरवस्था झाली होती. मनपाने त्याचे सुशोभीकरण करून पर्यटनस्थळामध्ये रूपांतर केले आहे. एका बाजूला हिºयाची प्रतिमा व दुसºया बाजूला थिंकरची प्रतिमा बसविली होती. लॉकडाऊनच्या काळात या दोन्ही प्रतिमांचीही तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे मनपाने दोन्ही प्रतिमा हटविल्या आहेत. जॉगिंग ट्रॅकवरील विद्युत दिव्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे सायंकाळी चालण्यासाठी जाणाºया नागरिकांची गैरसोय होत आहे.ज्वेल्स आॅफ नवी मुंबईच्या देखभालीकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. येथील प्रसाधानगृहाचीही व्यवस्थित देखभाल केली जात नाही. सद्य:स्थितीमध्ये प्रतिदिन ४ ते ५ हजार नागरिक येथे दिवसभरात येत असतात. येथील दुरवस्था पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्वेल्स ऑफ नवी मुंबईची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 11:46 PM