शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

धोक्याच्या सूचनांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष

By admin | Published: February 03, 2016 2:22 AM

सोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

जयंत धुळप/आविष्कार देसाई,  अलिबागसोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सारा महाराष्ट्र हादरून गेला आणि कोकणातील समुद्रात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या पर्यटकांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. कोकणात आणि विशेषत: रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीत आजवर समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्यामागे किनाऱ्यावर उपस्थित स्थानिकांच्या धोकाविषयक सूचना नाकारणे, बेफिकिरीने समुद्राच्या पाण्यात जाणे आणि दुर्दैवी मृत्यू ओढावून घेणे ही एकमेव समान परिस्थिती असल्याचे स्थानिक कोळी बांधव आणि पोलीस यांच्या निरीक्षण आणि नोंदीतून सातत्याने स्पष्ट झाले आहे. सोमवारी मुरुडमध्ये घडलेल्या घटनेच्यावेळीदेखील हीच परिस्थिती अनुभवास आली. मुले-मुली समुद्रात जात असताना स्थानिक नागरिक व जीवरक्षक यांनी आता समुद्राला ओहोटी आहे, असे अनेकदा आवर्जून सांगितले होते. मुलांनी ही धोक्याची सूचना नाकारून समुद्रात प्रवेश केल्याने ही दुघटना झाली. समुद्रात थोड्या अंतरावर एक खांब होता. त्याला हात लावण्याची स्पर्धा या मुलांमध्ये लागली होती. त्या स्पर्धेपोटी ही मुले समुद्रात गेली, अशीही परिस्थिती प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी सांगितली आणि अखेर नको तेच दुर्दैवी घडले. भरती-ओहोटीच्या वेळची ही तत्कालिक घळ निर्मिती व पुनर्भरणाची नैसर्गिक प्रक्रिया अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला, अलिबागचा किनारा येथे अनेकदा अनुभवास येते.> पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘गोवा पॅटर्न’ची गरजपर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर : पर्यटनाच्या सुरक्षिततेसाठी सुस्पष्ट धोरण नसल्याने रायगड जिल्ह्यातील बहुतांश समुद्रकिनारे पर्यटकांच्या जीवावर उठले आहेत. मांडव्यापासून थेट श्रीवर्धनपर्यंतच्या समुद्रकिनारी पर्यटकांची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसून येते. पर्यटनात अग्रेसर असणाऱ्या गोवा राज्याचे अनुकरण केल्यास यातील बरेचसे प्रश्न सुटण्यास निश्चितच मदत मिळणार आहे.जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, कर्जत माथेरान, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांचा प्रामुख्याने वाटा मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्यक्ष रोजगाराबरोबरच अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मितीही येथे मोठ्या संख्येने होत असल्याचे दिसून येते. वीकेंडला तर पर्यटकांच्या गाड्यांचा ताफाच या पर्यटनस्थळांकडे चाल करून येत असतो. उपलब्ध आकडेवारीनुसार पर्यटनाच्या हंगामात या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये सुमारे ६० हजार पर्यटक हे विविध पर्यटनस्थळांना भेट देतात. यातील निम्म्यापेक्षा जास्त पर्यटक हे समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक वेळ घालवित असतात. सुरक्षिततेसाठी अलिबागच्या मेन बीचशिवाय कोठेच सुरक्षा पुरवलेली नाही.अलिबाग नगरपालिकेने लाइफ गार्ड, स्पीड बोट, त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्यामध्ये बॅरेकेटिंग केले आहे. सूचना फलक, डेंजर झोन यांची माहिती दिली आहे. परंतु हे फक्त अलिबागच्या मेन बीचसाठीच मर्यादित आहे. मांडवा, सासवणे, किहीम, थळ, वरसोली, आक्षी, नागाव, रेवदंडा, बोर्ली-मांडला, काशिद, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन ही सर्व पर्यटनस्थळे विविध नगरपालिका अथवा वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या अखत्यारित येतात. त्यामुळे पर्यटकांना येथे सुरक्षा व्यवस्था पुरविण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘गोवा पॅटर्न’ची गरज आहे.