टोपलीधारकांना नेरळ ग्रामपंचायतीने दिली जागा
By Admin | Published: January 11, 2017 06:17 AM2017-01-11T06:17:11+5:302017-01-11T06:17:11+5:30
नेरळ-माथेरान रस्त्यावरील अतिक्रमणे मागील महिन्यात तोडण्यात आल्यानंतरही टोपलीमध्ये भाजीपाला आणि अन्य किरकोळ साहित्य घेऊन
कर्जत : नेरळ-माथेरान रस्त्यावरील अतिक्रमणे मागील महिन्यात तोडण्यात आल्यानंतरही टोपलीमध्ये भाजीपाला आणि अन्य किरकोळ साहित्य घेऊन रस्त्याच्या गटारावर बसून व्यवसाय केले जात होते. मात्र, अनेकांनी टोपलीधारकांना वेगळा न्याय लावण्यात येत असल्याबद्दल आवाज उठविण्यात आला होता. शेवटी नेरळ ग्रामपंचायतने सर्व टोपलीधारकांना तेथून उठविले होते. मात्र, त्या टोपलीधारकांनी ग्रामपंचायतीकडे तात्पुरती जागा मागितल्यानंतर त्यांना जागा दिली असून, तेथे ७० टोपलीधारक तेथे व्यवसाय करू लागले आहेत.
नेरळच्या मुख्य बाजारपेठेत अनेकांनी रस्त्यावर अतिक्र मण करून आपले व्यवसाय थाटले होते. ३० डिसेंबर रोजी अतिक्रमण हटविल्यानंतरही मोकळ्या झालेल्या रस्त्यावर आणि गटारावर टोपलीमध्ये विविध वस्तू ठेवून व्यवसाय केला जात होता. अतिक्र मण हटविल्यानंतर त्यांना सूट कशासाठी? म्हणून नेरळमधील सर्वांनी आवाज उठविला. शेवटी नेरळ ग्रामपंचायतने कारवाई करीत सर्व टोपल्या उचलून जप्त करण्याचा निर्णय घेतला. ते सर्व टोपलीधारक नेरळ ग्रामपंचायतमध्ये तात्पुरता व्यवसाय करण्याची परवानगी मागण्यासाठी गेले. त्यात मोठ्या संख्येने महिला असल्याने आणि त्या टोपलीमधील विविध वस्तू विकून अनेकांचे कुटुंब चालत असल्याने शेवटी त्यांची तात्पुरती सोय करण्याचा निर्णय नेरळ ग्रामपंचायतीने घेतला. त्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने कर्वे दवाखाना ते शिवसेना शाखा आणि पुढे शेतकरी भवन या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर त्यांना जागा निश्चित करण्यात आली.
७०हून अधिक टोपलीधारकांना प्रत्येकी एक टोपली ठेवण्याची परवानगी देताना तो परिसर तात्पुरत्या स्वरूपात टोपलीमध्ये वस्तूंची विक्र ी करणारे यांच्यासाठी आरक्षित करण्यात येऊन त्यांना देण्यात आला. या सर्व जागेची पाहणी नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच सुवर्णा नाईक, सदस्य प्रथमेश मोरे, मंगेश म्हसकर, नितेश शाह, राजेश मिरकुटे, संजीवनी हजारे, अनीता भालेराव आणि ग्रामविकास अधिकारी गाडेकर यांनी केली. त्यांच्यासोबत शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते. नेरळ शिवसेना शाखा कार्यालय आणि शेतकरी भवन परिसरात आता किरकोळ व्यापार टोपलीमधून सुरू झाला आहे.
सर्व जागेची के ली पाहणी
सर्व जागेची पाहणी नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच सुवर्णा नाईक, सदस्य प्रथमेश मोरे, मंगेश म्हसकर, नितेश शाह, राजेश मिरकुटे, संजीवनी हजारे, अनिता भालेराव आणि ग्रामविकास अधिकारी गाडेकर यांनी केली. नेरळ शिवसेना शाखा कार्यालय आणि शेतकरी भवन परिसरात आता किरकोळ व्यापार टोपलीमधून सुरु झाला असून त्याचे स्वागत नेरळमधील ग्राहक करीत आहेत. त्यांना एकाच ठिकाणी सर्व किरकोळ वस्तू मिळू लागल्या आहेत. त्यामुळे टोपलीधारकांचा व्यवसाय वाढला असून नेरळकरांना एकाच जागी वस्तू मिळत असल्याने त्यांची धावपळ थांबली असून सर्वांनी नेरळ ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.