नेरूळमध्ये जलवाहिनीमधून गळती, दुरुस्तीकडे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:57 PM2020-01-06T23:57:03+5:302020-01-06T23:57:14+5:30
नेरूळ सेक्टर २२ मधील जलकुंभाच्या बाहेरील जलवाहिनीला अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे.
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २२ मधील जलकुंभाच्या बाहेरील जलवाहिनीला अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे. प्रतिदिन हजारो लीटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. देशातील मुबलक जलसाठा उपलब्ध असलेल्या महानगरांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असल्यामुळे शहरवासीयांना वर्षभर पुरेसे पाणी उपलब्ध करून देता येते. यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याकडे प्रशासन व ठेकेदारही दुर्लक्ष करत आहेत. नेरूळ सेक्टर २२ मध्ये तेरणा हॉस्पिटलच्या समोरही महापालिकेचा जलकुंभ आहे. जलकुंभाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच पाणीगळती सुरू आहे. हजारो लीटर पाणी वाया जात आहे. पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारामध्ये हे पाणी सोडले जात आहे. दक्ष नागरिकांनी ही गोष्ट ठेकेदाराच्या व कर्मचाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. परंतु त्याची दुरुस्ती होत नाही.
या जलकुंभाची जबाबदारी असणारे अधिकारी व कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. जलकुंभाच्या बाहेर काहीही समस्या असल्यास या अधिकारी व कर्मचाºयांशी संपर्क साधावा, असा फलक लावला आहे. परंतु यामधील एका कर्मचाºयाचा फोन बंद होता व दुसºया कर्मचाºयांनी फोनच उचलला नाही. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी याकडे लक्ष देऊन गळती थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
>वाशीमधील पाणीचोरी सुरूच
सानपाडा व वाशी रेल्वे स्टेशनच्या मध्ये कॉल सेंटरमधील कर्मचाºयांची ने-आण करणाºया बसेस उभ्या केल्या जातात. या बसेसमधील चालक व वाहकांनी येथील जलवाहिनीमधील व्हॉल्वमधून पाणीचोरी सुरू केली आहे. वारंवार तक्रारी करूनही येथील चोरी थांबविली जात नसल्यामुळेही नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.