शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

नेरुळ-उरण रेल्वेचे स्वप्न पूर्णत्वाकडे; दोन दशकांची प्रतीक्षा संपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 1:49 AM

उलवे ते उरण परिसरातील लाखो नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे

- नामदेव मोरे नवी मुंबई : उलवे ते उरण परिसरातील लाखो नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. नेरुळ ते खारकोपर दरम्यान पहिल्या टप्प्यातील रेल्वे सेवा आॅक्टोबरपर्यंत सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूरहोऊन विकासालाही गती मिळणार आहे.नवी मुंबईमध्ये १९९२ मध्ये रेल्वे वाहतूक सुरू झाली व येथील विकासाला गती मिळाली. ठाणे- वाशी व ठाणे-पनवेल रेल्वे सुरू झाल्यानंतर कोपरखैरणे ते दिघा परिसरातील बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आले. वाशी ते पनवेलपर्यंतचा विकास गतीने होत असला तरी उरण परिसरात अपेक्षित गतीने विकास होत नव्हता. रेल्वे सेवा नसल्यामुळेच त्या परिसरामध्ये बांधकाम व्यवसाय धिम्या गतीने सुरू होता. यामुळे १९९७ मध्येच नेरुळ-उरण रेल्वे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च ४९५ कोटी रुपये होता; परंतु या मार्गामध्ये अनेक अडथळे येत गेले व प्रकल्पाचा खर्च तब्बल १७८२ कोटी रुपयांवर गेला. जमीन संपादनासह वनविभागाच्या अडथळ्यामुळे निर्धारित वेळेमध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. सिडकोने विमानतळाचे काम सुरू केल्यानंतर रेल्वे प्रकल्पाच्या कामांनाही गती दिली. नेरुळ-उरण रेल्वेचे दोन टप्पे करण्यात आले. पहिल्या टप्प्यात १२ किलोमीटरचा समावेश करण्यात आला. या मार्गावरील कामे जवळपास पूर्ण होत आली होती; परंतु प्रत्यक्षात कधी रेल्वे सुरू होणार याविषयी ठोस तारीख सांगितली नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी घेतलेल्या मीटिंगमध्ये रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पहिला टप्पा आॅक्टोबरमध्ये सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.आॅक्टोबरमध्ये रेल्वे सुरू झाल्यास विकासाला मोठी गती मिळणार आहे. सिडकोने उलवे नोड विकसित केला; परंतु वाहतुकीची सोय नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली होती. जुईनगर, नेरुळ व सीबीडी रेल्वे स्टेशनपासून खासगी टॅक्सी व रिक्षांचा वापर करून उलवे येथे जावे लागत होते. उरण महामार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असल्यामुळे व बसेसची संख्या मर्यादित असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. रेल्वे सेवा लवकर सुरू व्हावी, अशी मागणी केली जात होती. अखेर आॅक्टोबरचा मुहूर्त सापडला आहे.पहिल्या टप्प्यातील रेल्वे स्थानकाची उभारणी सिडको करणार आहे. सागरसंगम वगळता इतर रेल्वे स्थानकाची महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. रेल्वे प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक कामे केली जात आहेत.तरघर होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानकउरण मार्गावर तरघर रेल्वेस्थानक विमानतळापासून जवळ असणार आहे. यामुळे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानक करण्याचा सिडकोचा मानस आहे. रेल्वे सुरू करण्यासाठीचे काम पूर्ण केले जाणार असून उर्वरित विकासकामे टप्प्या टप्प्याने केली जाणार आहेत.उलवेवासीयांना दिलासासिडकोने उलवे नोड विकसित केला असून त्या परिसरामध्ये हजारो नागरिक वास्तव्यासाठी गेले आहेत. रेल्वे नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना बस, रिक्षा व टॅक्सी, जीपचा आधार घ्यावा लागत आहे. वाहतुकीची सोय नसल्यामुळे अनेकांनी घरे खरेदी करूनही तेथे वास्तव्यास जाणे टाळले आहे. या सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.बांधकाम उद्योगालाही गतीउलवे परिसरामध्ये शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू आहे. दोन महिन्यांत रेल्वे सुरू होणार असल्यामुळे या परिसरातील बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे. घरांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. या परिसरामधील गुंतवणूक वाढणार आहे.पहिला टप्पारेल्वे मार्गाची लांबी : १२ किलोमीटरमार्गाचे स्वरूप : सीवूड ते खारकोपर व बेलापूर ते सागरसंगमसीवूड : पहिल्या टप्प्याची सुरुवात सीवूड रेल्वेस्थानकापासून होणार आहे. येथील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन २०१६ मध्येच त्याचा वापर सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण केले जाईल.तारघर : सिडकोने रेल्वेस्थानकाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, स्थानक इमारतीच्या एकात्मिक विकासाची कामे प्रगतिपथावर असून १८६ मीटर लांबीचे संपूर्ण आरसीसी छताचे काम पूर्ण झाले आहे.बामणडोंगरी : सिडकोने प्लॅटफॉर्म व आवश्यक कामे पूर्ण करून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतर केले आहे. फर्निचर व इतर कामे प्रगतिपथावर आहेत.खारकोपर स्थानक : स्थानकाची अत्यावश्यक कामे पूर्ण करून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतर करण्यात आली आहेत. बेंचेस, अत्यावश्यक फर्निचरची कामे सुरू आहेत.दुसरा टप्पारेल्वे मार्गाची लांबी :१५ किलोमीटरमार्गाचे ठिकाण : खारकोपर, गव्हाण, रांजनपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी-उरणमध्य रेल्वेने दुसºया टप्प्यामधील चार स्थानकांचे काम सुरू केले आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत दुसºया टप्प्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.दुसºया टप्प्यातील प्रमुख आगारकाम, पूल, भुयारी मार्गांचे काम पूर्ण होत आले आहे.दुसºया टप्प्यामध्ये १३.९३ हेक्टर जमीन संपादित केली असून, उर्वरित जमीन संपादनाचे काम सुरू आहे.या मार्गावर चार हेक्टर जमीन वनविभागाची असून त्यासाठीची मंजुरी आली आहे.उरण मार्गावरील रेल्वेस्थानक : सीवूड, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजनपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी आणि उरणवैशिष्ट्ये : रोडवर चार महत्त्वाचे पूल, ७८ छोटे पूल, १५ भुयारी मार्ग, प्रवाशांसाठी सर्व सुविधा असलेली रेल्वेस्थानक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईrailwayरेल्वे