नवी मुंबई : नेरु ळ विभागातील वंडर्स पार्कमधील खेळणी नादुरु स्त असून, सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच पार्कमध्ये विविध सुविधांचीही दुरवस्था झाली असून, या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्कमध्ये फेरबदल करून सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी मिळाली असून, या कामासाठी सुमारे कोटी रु पयांचा खर्च करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नेरु ळ सेक्टर १९ येथे वंडर्स पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी बसविण्यातआलेली विविध खेळणी तसेच पार्कमधील विविध आकर्षण यामुळे शहरातूनच नव्हे, तर शहराबाहेरील नागरिकही या पार्कमध्ये येतात.खेळणी आणि इतर सुविधांच्या देखभाल आणि दुरु स्तीकडे महापालिका आणि कंत्राटदार यांचे दुर्लक्ष झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून पार्कमधील खेळण्यांची दुरवस्था झाली असून, खेळणी धोकादायक स्थितीमध्ये आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही खेळणी बंद ठेवण्यात आली आहेत. खेळणी बंद असल्याने पार्कमध्ये येणाºया नागरिक आणि बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. महापालिकेने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून, या पार्कमध्ये फेरबदल आणि सुधारणा करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी मांडला होता, या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाली आहे.यामध्ये नावीन्यपूर्ण राइड्स बसविणे, म्युजिकल फाउंटन बसविणे, अॅम्पिथिएटरला रु फिंग करणे, वॉटर बॉडीला लायनर बसवून वॉटरप्रूफिंग करणे, स्मार्ट कार्ड सिस्टीम बसविणे, पब्लिक अॅड्रेस आणि आॅडिओ सिस्टीम बसविणे, सीसीटीव्ही बसविणे, नावीन्यपूर्ण विद्युत दिवे बसविणे, तसेच स्थापत्य विषयक विविध दुरु स्तीची कामे करणे आदी कामे करण्यात येणार असून, या कामांसाठी सुमारे २७ कोटी ३५ लाख रु पये खर्च केले जाणार आहेत.सदर प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाली असून, लवकरच कामाला प्रत्यक्षात सुरु वात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना वंडर्स पार्कमध्ये नावीन्यपूर्ण सुविधा उपलब्ध होणार आहेत.