नवी मुंबई : कोरोना संकटामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी बुधवारपासून आॅनलाइन शाळा सुरू करण्यासाठी नवी मुंबई शहरातील अनेक खाजगी शाळांनी भर दिला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून, या विद्यार्थ्यांनादेखील आॅनलाइन शिक्षण देण्याबाबत महापालिका प्रशासन विचाराधीन आहे.
नवी मुंबई शहरात अनेक खाजगी शाळा आहेत. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी यामध्ये सीबीएसईच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा झाल्या होत्या. त्याअनुषंगाने त्यांचे आॅनलाइन निकाल जाहीर करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या सीबीएसईच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाला या वर्षी आॅनलाइन पद्धतीने सुरुवात झाली. त्यानंतर मे महिन्यात सुट्टी देऊन जून महिन्यात पुन्हा आॅनलाइन अभ्यासाला सुरुवात करण्यात आली आहे. इयत्ता पहिली आणि दुसरीत शिकणाºया लहान विद्यार्थ्यांवर आॅनलाइन शिक्षणाचा ताण येऊ नये यासाठी दररोज दोन ते तीन विषयांचे तास, तर इतर इयत्तांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचे सुमारे चार ते पाच विषयांचे तास घेण्यात येत आहेत. काही शाळांमधून योगाच्या तासाने सुरुवात केली जात आहे.नवी मुंबई महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी महापालिका विविध विषयांचे व्हिडीओ बनविणार असून, अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्हिडीओ पाठविण्याच्या विचाराधीन प्रशासन आहे.नव्याने शाळा प्रवेशाविषयी संभ्रमच्आॅनलाइन पद्धतीने शाळा सुरू केल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये नवीन अॅडमिशन कधी होणार? त्याची प्रक्रिया कशी असणार? याबाबत कोणतीही नियमावली तयार करण्यात आली नसल्याने पालकांमध्ये संभ्रम आहे.च्आरटीईअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे; परंतु अॅडमिशनची प्रकिया झालेली नाही. शाळांमध्ये आॅनलाइन शिक्षण सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल की काय? अशी भीती पालक व्यक्त करीत आहेत.