शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

पनवेल-नवी मुंबईच्या वेशीवर नवे शहर: १७,२३० कोटींची गुंतवणूक

By नारायण जाधव | Published: May 15, 2023 6:43 PM

हिरानंदानी समूहाची टाऊनशिप

नवी मुंबई :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा-शेवा-शिवडी सी-लिंक एकीकडे आकार घेत असताना दुसरीकडे देशातील बांधकाम व्यावसायिकांनी नवी मुंबई-पनवेल परिसरात मोठमोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. याच अंतर्गत आता निरंजन हिरानंदानी समूहाच्या परसिपिना डेव्हलपर्स कंपनीने पनवेल-नवी मुंबईच्या वेशीवर नवे शहर वसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित नवी टाऊनशिप पनवेल तालुक्यातील बारवी, भोकरपाडा आणि खालापूर तालुक्यातील पाणशिल-तळेगाव या गावांच्या हद्दीतील १८९ हेक्टर अर्थात ४७२.५ एकर जमिनीवर बांधण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रस्तावित टाऊनशिपमध्ये परसिपिना डेव्हलपर्स कंपनी सुमारे १७२३० कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पर्यावरणविषयक मंजुरीसाठी राज्य परिवेश समितीने स्वीकारून तो आपल्या आगामी बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेसमोर ठेवला आहे. परिवेश समितीची मंजुरी मिळाल्यानंतर या नव्या शहराच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर होणार आहे.

या टाऊनिशपमध्ये ३३४५८ घरेपरसिपिना डेव्हलपर्सच्या या टाऊनशिपमध्ये १७६.४० मीटर उंचीच्या १८२ इमारती बांधण्यात येणार आहेत. या इमारतींमध्ये ३३४५८ घरे बांधण्यात येणार असल्याचे कंपनीने याबाबतच्या प्रस्तावात म्हटले आहे. मात्र, ही किती आकारमानाची असतील, याचा उल्लेख नाही. सुमारे १८९४०१० चौरस मीटर क्षेत्रावर ८२,८५,५९३.८१ चौरस मीटर इतके बांधकाम करण्यात येणार आहे.

विस्तीर्ण पार्किंगची सोयनव्या टाऊनशिपमध्ये ५७८१० चारचाकी आणि १५९५६६ दुचाकी आणि दोन ट्रक च्या पार्किंगची सोय असणार आहे. यामुळे वसाहतील वाहने कुठे पार्क करायची हा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच वाहतूककोंडीही होणार नाही, असे सांगण्यात आले.

३३ एमएलडी पाणी लागणारया टाऊनशिपसाठी ३३ एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. मात्र, ही गरज महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण भागविणार असून सुरुवातीला बांधकाम सुरू असताना दररोज एक एमएलडी पाणी देण्याची तयारी प्राधिकरणाने दर्शविली असून तसे पत्रही दिले आहे.

बफर एरियात धरणे, नद्या, जलाशयेटाऊनशिपच्या १० किमीच्या बफर क्षेत्रात धरणे, नद्या, जलाशयांचा समावेश आहे. यात काळुंद्री नदी, पाताळगंगा नदी, किरकिरी नदी यासह मोरबे धरण, मोहपाडा, भिलवडे, जांभिवली या जलाशयाचा समावेश आहे.

२१८१ वृक्षांची होणार कत्तलटाऊनशिपच्या परिसरात ११.३० हेक्टर क्षेत्र हरित क्षेत्र राहणार आहे. मात्र, तरीही २१८१ वृक्षांची बांधकामासाठी कत्तल करावी लागणार आहे. या बदल्यात विकासक ११५६३६ इतकी वृक्षलागवड करणार आहे.

तीन महामार्गांना लागून वसाहतप्रस्तावित टाऊनशिप जुना मुंबई-पुणे मार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा या तीन महामार्गांना लागून असणार आहे. शिवाय प्रस्तावित न्हावा-शेवा-शिवडी सी-लिंक हा चिर्ले जंक्शन येथे आंतरमार्गिकांद्वारे या तिन्ही महामार्गांना जोडण्यात येणार आहे. शिवाय प्रस्तावित विरार-अलिबाग काॅरिडोर याच परिसरातून जाणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई