शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

नवी मुंबई विमानतळासाठी आता नवीन डेडलाइन; २०२४ पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 11:48 AM

पनवेलजवळ ११६० हेक्टर जागेवर सोळा हजार कोटी रूपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : देशातील पहिले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. परंतु विविध कारणांमुळे विमानतळाचे काम रखडले आहे. परिणामी विमानाचे टेकऑफही लांबणीवर पडले आहे. असे असले तरी सिडकोने आता २०२४ ची नवीन डेडलाइन जाहीर केली आहे. विमानतळ उभारणीचे काम अदानी समूहाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन टेकऑफ होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.

पनवेलजवळ ११६० हेक्टर जागेवर सोळा हजार कोटी रूपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील हे दुसरे अंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. या विमानतळाच्या उभारणीचा ठेका जीव्हीके या कंपनीला देण्यात आला होता. त्यानुसार जीव्हीकेने विमानतळाच्या पहिल्या टप्यातील प्रकल्पपूर्व कामांना सुरूवातही केली होती. परंतु ही कामे अंतिम टप्यात असतानाच आर्थिक अडचणीमुळे जीव्हीकेने माघार घेतली. त्यामुळे ऑगस्ट २०२० मध्ये नवीन ठेकेदार म्हणून अदानी समूहाचा या प्रकल्पात शिरकाव झाला.

विशेष म्हणजे अदानी समूहाकडे विमानतळाच्या कामाची हस्तांतरण प्रक्रियाही आता पूर्ण झाली आहे. सिडकोच्या संचालक मंडळासह राज्य सरकारच्या संबंधित विभागानेही त्यावर मोहर लावली आहे. त्यामुळे अदानी समूहाकडून विमानतळाच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाईल, असा विश्वास डॉ. मुखर्जी यांनी व्यक्त केला  आहे. तीन टप्यात उभारल्या जाणाऱ्या या विमानतळाला २००८ मध्ये केंद्र सरकारची परवानगी मिळाली. त्यानंतर २०१२ पर्यंत पहिला टप्या पूर्ण होणे अपेक्षित होते. पण भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तसेच आवश्यक विविध प्राधिकरणांच्या परवानगी आदींसाठी विलंब झाला. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास २०१६ ची वाट पाहवी लागली. सुरूवातीच्या काळात पुनर्वसन आणि प्रकल्पूर्व कामांवर भर देण्यात आला.

१८ फ्रेब्रुवारी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानुसार २०१९ मध्ये नवी मुंबई विमानतळावरून पहिले टेकऑफ होईल, असे जाहीर केले होते. परंतु हा मुहूर्तही टळला. त्यानंतर २०२० चा मुहूर्त निश्चित करण्यात आला. परंतु हे संपूर्ण वर्ष कोविडविरूध्द लढण्यात गेल्याने विमानाच्या उड्डाणाला पुन्हा ब्रेक लागला. त्यानंतर पुन्हा २०२२ चा मुहूर्त जाहीर करण्यात आला. परंतु स्थलांतराला ग्रामस्थांचा होत असलेला विरोध, कोरोनाचा संसर्ग व ठेकेदाराची माघार आदी कारणांमुळे विमानतळाच्या कामाला खीळ बसली आहे. त्यानंतर आता २०२४ ची नवीन डेडलाईन जाहीर केली आहे.

प्रस्तावित विमानतळाची प्रवासी क्षमता

नवी मुंबई विमानतळाचे काम तीन टप्यात पूर्ण करण्याची योजना आहे. यातील पहिल्या टप्यात वर्षाला १ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्यात अडीच कोटी प्रवाशांची ने-आण करता येणार आहे. तिसऱ्या टप्यात सहा कोटी प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे.

नामकारणाचा वाद

विमानतळ प्रकल्पपूर्ण होण्याअगोदरच त्याच्या नामकारणाचा वाद सुरु झाला आहे. राज्य सरकारने प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी स्थानिक प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी अलिकडेच मोर्चाही काढला होता. तसेच विमानतळाच्या नामकारणासाठी राज्य सरकारला १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको