नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 9 मार्चला प्रसिद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:13 PM2020-02-25T15:13:59+5:302020-02-25T15:14:39+5:30

नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिका पोटनिवडणुका

New Delhi and Aurangabad Municipal Corporation draft voter lists release on March 9 | नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 9 मार्चला प्रसिद्धी

नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 9 मार्चला प्रसिद्धी

Next

मुंबई  : नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तर नाशिक, धुळे, परभणी व ठाणे या चार महानगरपालिकांतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता 9 मार्च 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या 31 जानेवारी 2020 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 9 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारूप मतदान याद्यांवर 16 मार्च 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या अनुक्रमे 23 व 24 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. अंतिम मतदार याद्या 26 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. 

नाशिक महानगरपालिकेच्या 4अ, धुळे महानगरपालिकेच्या 5ब, परभणी महानगरपालिकेच्या 11ब आणि ठाणे महानगरपालिकेच्या 30अ या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील या मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

Web Title: New Delhi and Aurangabad Municipal Corporation draft voter lists release on March 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.