वाशीसह बेलापरमध्ये नवे पावसाळी जलउदंचन केंद्र, ७१ कोटी ८४ लाख खर्च
By नारायण जाधव | Published: May 25, 2024 04:57 PM2024-05-25T16:57:09+5:302024-05-25T16:57:34+5:30
पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होऊ शकत नसल्याने त्याला पर्यायी उपाययोजना म्हणून नवीन पावसाळी जलउदंचन केंद्र उभारण्यात येणार आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ७१ कोटी ८४ लाख खर्चून सीबीडी आणि वाशी परिसरात पर्जन्य जलउदंचन केंद्र लवकरच उभारले जाणार असून, यामुळे पाणी साचण्याचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास नवी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला.
पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होऊ शकत नसल्याने त्याला पर्यायी उपाययोजना म्हणून नवीन पावसाळी जलउदंचन केंद्र उभारण्यात येणार आहे. सीबीडी या परिसरात पावसाळ्यादरम्यान पाणी साचते, त्यामुळे सीबीडी येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये, याकरिता आ. म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नवी मुंबई महानगरपालिकेने येथील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्याचे कामे हाती घेतली आहेत. वाशी येथील जलउदंचन केंद्राचे अपेक्षित खर्च ३७ कोटी ३१ लाख व बेलापूर जलउदंचन केंद्राचे अपेक्षित खर्च ३४ कोटी ५३ लाख इतका येणार असल्याचे आ. म्हात्रे यांनी सांगितले.