शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

आपत्ती व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न, महापालिकेच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 2:39 AM

२६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीनंतर राज्यात सर्वप्रथम नवी मुंबईमधील जनजीवन पूर्वपदावर आले होते. २९ आॅगस्टलाही पाऊस थांबताच काही क्षणात सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले.

नामदेव मोरेनवी मुंबई : २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीनंतर राज्यात सर्वप्रथम नवी मुंबईमधील जनजीवन पूर्वपदावर आले होते. २९ आॅगस्टलाही पाऊस थांबताच काही क्षणात सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले. पालिकेने पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी ५५० किलोमीटर लांबीची बांधलेली गटारे, होल्डिंग पाँड्स व इतर उपाययोजनांमुळे हे शक्य झाले असून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पॅटर्नची राज्यभर चर्चा होवू लागली आहे.मुंबईसह महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील सर्व व्यवहार कोलमडले. रेल्वे सेवा ठप्प झाली. बसेस व इतर सर्व वाहतूक व्यवस्थेचाही बोजवारा उडाला. चाकरमानी रोडवर अडकून पडले. २१ पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला. पाऊस थांबल्याच्या दुसºया दिवशीही वाहतूक सेवा विस्कळीतच होती. मुंबईची तुंंबापुरी झाली असताना त्याला लागून असलेल्या नवी मुंबईमध्ये मात्र २९ आॅगस्टलाही अपवाद वगळता जनजीवन सुरळीत होते. हॉटेल, खासगी व शासकीय कार्यालये सुरू होती. वाशी ते पनवेल रेल्वे वाहतूकही सुरळीत होती. सात ते आठ ठिकाणी काही प्रमाणात पाणी साचले असले तरी इतर सर्व ठिकाणी पाण्याचा योग्यपद्धतीने निचरा होत होता. अतिवृष्टी थांबल्यानंतर एक तासामध्ये सर्व रोड कोरडे झाले होते. दुसºया दिवशी अतिवृष्टीच्या कोणत्याच खाणाखुणा शहरात दिसत नव्हत्या. राज्यात सर्वात अगोदर नवी मुंबईतील जनजीवन पूर्वपदावर आले. याचे सर्व श्रेय महापालिकेने घेतलेल्या परिश्रमाला द्यावे लागेल. महापालिकेने शहरामध्ये तब्बल ५५० किलोमीटर लांबीची गटारे बांधली आहेत. मलनि:सारण वाहिन्यांचे सक्षम जाळे विणले आहे. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी ७४ किलोमीटर लांबीच्या नाल्यांमधील गाळ काढला जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी होल्डिंग पाँड उभारण्यात आले आहेत.२६ जुलैच्या अतिवृष्टीमध्ये शहरामध्ये तब्बल १३० ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यास अडथळे निर्माण झाले होते. महापालिकेने त्या सर्व ठिकाणांची नोंद करून आवश्यक ते बदल केले. पाणी वाहून नेण्यासाठी गटारांचे बांधकाम केले. इतरही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. पुन्हा अतिवृष्टी झालीच तर शहरात पाणी साचणार नाही. पाणी साचले तरी कमीत कमी वेळेमध्ये त्या पाण्याचा निचरा होईल अशी यंत्रणा तयार करण्यात आली. १२ वर्षे सातत्याने केलेल्या मेहनतीमुळेच नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसामध्येही जीवित व वित्त हानी झाली नाही. रेल्वे, बस, रिक्षा व इतर सेवाही सुरळीत सुरू होत्या. नवी मुंबई महापालिकेच्या या उपाययोजनांमुळेच अतिवृष्टीमध्ये राज्यात सर्वात प्रथम नवी मुंबईतील जनजीवन पूर्वपदावर आले. राज्यातील इतर महापालिका व शहरांनीही याप्रमाणे उपाययोजना केल्या तर भविष्यात मुंबईची तुंबापुरी होणार नाही अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.मला नोकरीसाठी सीएसटीला जावे लागते. २९ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मला मुंबईहून नवी मुंबई गाठायला ६ तास लागले. मात्र जेव्हा नवी मुंबईत पोहोचली तेव्हा मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला. नवी मुंबईत एनएनएमटीच्या गाड्या, वाशी-पनवेल लोकल सेवा सुरु असल्याने तासभराच्या आत घरी पोहोचणे शक्य झाले. त्यामुळे नवी मुंबई परिवहन सेवेने पुरविलेल्या अतिरिक्त बस आणि पालिकेच्या आपत्ती निवारणासारख्या सक्षम यंत्रणेमुळे सुदैवाने नवी मुंबईकरांना या पावसाचा फारसा फटका बसला नाही.- किमया परजणे, नोकरीनवी मुंबई सुनियोजित शहर असल्याचे अभिमानाने सांगावेसे वाटते. शहरावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणा, त्यांनी केलेले नियोजन, शहरातील स्वच्छता या सर्वांमुळे नवी मुंबईमध्ये आणीबाणीची परिस्थिती आली नाही. याठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरु असली तरी देखील पावसात अडकण्यासारख्या घटना मात्र घडल्या नाहीत त्यामुळे या शहरातील नागरिक असल्याचा खरोखरच गर्व वाटतो- भ्रमरी शेट्टी, विद्यार्थिनीमुंबईमधील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकणाºया नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना मुंबईतील विद्यार्थ्यांकडून गावाकडून आलेले विद्यार्थी अशी टिंगल केली जाते. मात्र अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटातून मात्र नवी मुंबईच सर्वात आधी सावरली असून येथील यंत्रणा आणि नियोजन किती मजबूत आहे याची प्रचिती आली. महापालिकेचे विशेष आभार मानावेसे वाटत असून नैसर्गिक आपत्ती निवारण्याकरिता असलेल्या सर्वच यंत्रणा आणि कर्मचाºयांचे कौतुक करावेसे वाटते.- अभिलाष रेड्डी, विद्यार्थीमहापालिकेने पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी तब्बल ५५० किमीची अंतर्गत गटारे बांधली आहेत. ७४ किमीचे मोठे नाले आहेत. २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या. नाले, कल्हर्ट व इतर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिकांपेक्षा कमी वेळेत नवी मुंबईतील जनजीवन पूर्वपदावर आले.- मोहन डगावकर,शहर अभियंता, महापालिका