शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

महापालिका नवीन; समस्या जुन्याच

By admin | Published: May 03, 2017 6:07 AM

पनवेल शहर आणि बाजूचा विचार केला तर चार प्रभागांची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा परिसर पूर्वी पनवेल नगरपालिका

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीपनवेल शहर आणि बाजूचा विचार केला तर चार प्रभागांची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा परिसर पूर्वी पनवेल नगरपालिका हद्दीत येत होता. त्यामुळे पाणी, वीज, गटार, अंतर्गत रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. याशिवाय पार्किंगची समस्या गंभीर बनलेली आहे त्यामुळे महापालिका नवीन; परंतु समस्या त्याच अशी स्थिती या प्रभागांमध्ये आहे.पनवेल शहरात १८ आणि १९ हे दोन प्रभाग येतात. त्याचबरोबर १४ आणि २०मध्ये पनवेल शहराचा बराचसा भाग आहे. त्यामुळे एकूण चार प्रभागांवर पनवेल शहराचा प्रभाव आहे. गाढी नदीच्या पलीकडील भाग वगळता इतर भाग हा पनवेल नगरपालिका क्षेत्रात येत होता. प्रभाग १८ आणि १९चा विचार केल्यास पनवेल येथे आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. व्यापारी पेठांच्या शहरात रस्ते अरुंद आहेत. चालण्यासाठी पदपथांचा अभाव आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना बाजारपेठेत नाहीत. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत फारशा हालचाली झालेल्या नाहीत. एनएमएमटी बससेवा सुरू झाली तरी अंतर्गत प्रवासाकरिता रिक्षांवर अवलंबून राहावे लागत आहे. मीटरप्रमाणे भाडे न आकारणे हा कळीचा मुद्दा कायम आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू असले तरी कामात अनेक अडथळे येत आहेत. आजही अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था चांगली नाही. भुयारी गटार योजना राबविण्यात आली आहे; परंतु ते करीत असताना अनेक तांत्रिक बाबींचा विचार केला गेला नाही. पिण्याचा पाण्याचा प्रश्न दोन्ही प्रभागात आहे. मागणीपेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याने दिवसाआड पाणी पनवेलकरांना दिले जाते. सिडकोची क्षेपणभूमी बंद असल्याने शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. दोन्ही प्रभागात बहुंताशी इमारतींमध्ये पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीला निमंत्रण दिले जाते. सार्वजनिक पार्किंगचा अभाव असल्याने हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. बाजारपेठेत मालाची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे कोंडी निर्माण होते. अनियमित वीजपुरवठा ही समस्या नित्याचीच बनली आहे. अंतर्गत वीजवाहिन्या टाकण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे.प्रभाग क्र मांक-१४ समस्यांचे आगारपनवेल शहरातील बावन बंगला, किनारा सोसायटी, साईनगर, मुस्लीम मोहल्ले, धाकटा आणि मोठा खांदा व खांदा वसाहतीतील एक सेक्टर हा परिसर प्रभाग चौदामध्ये येतो. बावन बंगला परिसर सखल असल्याने येथे पावसाचे पाणी शिरते, रस्त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दोनही खांदा गावातसुद्धा आरोग्यापासून विविध सुविधांचा अभाव आहे.प्रभाग-२०मध्ये  अनेक प्रश्नपोदीचा काही भाग आणि तक्का तसेच काळुंद्रे गावाचा या प्रभागात समावेश आहे. ग्रामपंचायत हद्द या प्रभागात आली असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याची विल्हेवाट हे मुद्दे ऐरणीवर आहेत.