नवीन पनवेलमध्ये वीज ग्राहकांना लुबाडणारी टोळी सक्रिय, लाखोंच्या बिलाची भीती दाखवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:04 AM2020-09-14T00:04:19+5:302020-09-14T00:04:53+5:30

महावितरणकडे या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत असून, ग्राहकांना अशा लोकांपासून सतर्क राहण्याचे आवाहन महावितरण अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.

In New Panvel, gangs active in swindling power consumers are active, fearing a bill of lakhs | नवीन पनवेलमध्ये वीज ग्राहकांना लुबाडणारी टोळी सक्रिय, लाखोंच्या बिलाची भीती दाखवली

नवीन पनवेलमध्ये वीज ग्राहकांना लुबाडणारी टोळी सक्रिय, लाखोंच्या बिलाची भीती दाखवली

googlenewsNext

- वैभव गायकर

पनवेल : लॉकडाऊनच्या काळात अनेक दिवसांपासून घरी बसलेले ग्राहक वाढीव वीजबिलांना कंटाळले आहेत. अनेकांचे वीजबिल काही महिन्यांपासून थकीत असताना, अशा ग्राहकांची माहिती काढून या ग्राहकांना महावितरणच्या कारवाईची भीती दाखवून लुबाडणारी टोळी पनवेलमध्ये सक्रिय झाली आहे. महावितरणकडे या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत असून, ग्राहकांना अशा लोकांपासून सतर्क राहण्याचे आवाहन महावितरण अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.
नवीन पनवेलमधील एका वीज ग्राहकाला थकीत वीजबिल, तसेच विजेचा वापर वाढल्याचे कारण सांगत, त्याच्याकडून लाखो रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात येईल, अशी भीती दाखविली. महावितरणचे नाव सांगत, एका भामट्याने हा प्रकार केल्याचे या ग्राहकाला महावितरण कार्यालयात धाव घेतल्यावर निदर्शनास आले. या ग्राहकाचे वीजमीटरही संबंधित इसम घेऊन गेल्याचा प्रकार महावितरण अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर उघड झाला.
एकीकडे वाढीव बिलांमध्ये हैराण झालेल्या नागरिकांना लुटणारी टोळी सक्रिय झाल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. पनवेलमध्ये लाखो महावितरणचे ग्राहक आहेत. वाढीव वीजबिलामुळे अनेकांनी आपले वीजबिल भरलेले नाही. वाढीव बिलासंदर्भात महावितरणच्या विभागीय कार्यालयावरही नागरिकांनी राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. वाढीव बिलातून शासनामार्फत दिलासा मिळेल, असा नागरिकांचा समज आहे. मागील काही महिन्यांपासून बिल न भरलेल्या नागरिकांना जाब विचारून त्यांची लुबाडणूक होत असल्याचे या प्रकारामधून उघड झाले आहे.



महावितरणच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात एकही ग्राहकाची वीजजोडणी खंडित केलेली नाही, अथवा ग्राहकांच्या घरात भेट देत मीटर चेकिंग केले गेलेले नाही. खोटी कारणे सांगून ग्राहकांना धमकावले जात असल्यास संबंधित इसमाकडून ओळखपत्राची मागणी करावी व महावितरणकडे या संदर्भात तत्काळ तक्रार करावी.
- जयदीप नानोटे , अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पनवेल शहर उपविभाग महावितरण

Web Title: In New Panvel, gangs active in swindling power consumers are active, fearing a bill of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल