नवीन पनवेलमधील दोन्ही सर्कल झाली लहान!

By admin | Published: February 22, 2017 06:59 AM2017-02-22T06:59:16+5:302017-02-22T06:59:16+5:30

नवीन पनवेलमधील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी दोन्ही सर्कल लहान

The new panvel has two circles! | नवीन पनवेलमधील दोन्ही सर्कल झाली लहान!

नवीन पनवेलमधील दोन्ही सर्कल झाली लहान!

Next

पनवेल : नवीन पनवेलमधील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी दोन्ही सर्कल लहान करण्याच्या ५५ लाख रु पयांच्या कामाला सिडकोने सुरुवात केल्याने आता वाहतूककोंडी कमी होईल, असा विश्वास माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
नवीन पनवेलमधील प्रवेशव्दारावर असलेल्या एचडीएफसी चौकात नेहमीच वाहतूककोंडी होत असते. याबाबत नागरिक नेहमीच वाहतूक पोलिसांना दोष देत असत. ‘लोकमत’ने सप्टेंबर २०१६ मध्ये याबाबत बातमी ही प्रसिद्ध केली होती. त्या वेळी वाहतूक शाखेचे निरीक्षक विजय कादबाने यांनी सिडकोने या चौकातील सर्कल लहान केल्यास वाहतूककोंडी कमी होईल, असे सांगितले होते. सिडकोचे तत्कालीन कार्यकारी अभियंता पी. व्ही. मूल यांनी आम्ही प्रस्ताव पाठवला असून तो लवकरच मंजूर होऊन आल्यावर कामाला सुरु वात होईल असे त्या वेळी सांगितले होते. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी सिडकोकडे याचा पाठपुरावा केला. त्यामुळे एचडीएफसी चौक व आदई चौकातील सर्कल कमी करण्यास सिडकोने मंजुरी देऊन ५५ लाख रु पये मंजूर केले. शनिवारी रात्री एचडीएफसी चौकात या कामालासुरुवात झाली आहे. या भागात रात्रीच्या वेळी वाहतूक कमी असल्याने शनिवारी रात्री येथील सर्कल कमी करण्यात आले. रविवारी सकाळी त्याचा परिणाम दिसून आला. या भागात वाहतूककोंडी झाली नाही. (वार्ताहर)

Web Title: The new panvel has two circles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.