शहरातील व्यापारी संकुलात नवे टपाल कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:25 PM2019-05-27T23:25:06+5:302019-05-27T23:25:11+5:30

शहरात शिवाजी चौकाजवळील विलासराव देशमुख व्यापारी संकुलात सोमवारपासून पनवेल टपाल कार्यालय कार्यरत झाले आहे.

The new post office in the business complex of the city | शहरातील व्यापारी संकुलात नवे टपाल कार्यालय

शहरातील व्यापारी संकुलात नवे टपाल कार्यालय

Next

पनवेल : शहरात शिवाजी चौकाजवळील विलासराव देशमुख व्यापारी संकुलात सोमवारपासून पनवेल टपाल कार्यालय कार्यरत झाले आहे. हे कार्यालय नवीन पनवेल येथील मुख्यालयात स्थलांतरित करण्यात आले होते. कार्यालय पुन्हा शहरात आणण्यासाठी सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता.
पनवेल शहर टपाल कार्यालय १९४२ पासून कार्यरत आहे. या इमारतीची दुरवस्था झाल्याने पनवेल महापालिकेने ती धोकादायक असल्याचे जाहीर केले. त्यामुळे टपाल कार्यालय अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी घरकुल संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सोबतीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला होता, परंतु टपाल कार्यालयास आवश्यक जागा उपलब्ध झाली नाही. गतवर्षी पावसाळी धोकादायक इमारतीचा विचार करून टपाल कार्यालय नवीन पनवेल येथील मुख्य पोस्ट कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले. मात्र त्यामुळे पनवेल शहरातील नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना व महिला बचत गट यांची गैरसोय होऊ लागली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेत टपाल कार्यालयासाठी शहरात जागा उपलब्ध करण्याची विनंती महापालिकेच्या आयुक्तांना केली होती. सेनेचे प्रथमेश सोमण, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कफचे अरुण भिसे, नगरसेविका मुग्धा लोंढे, नगरसेवक नितीन पाटील यांनीही यासाठी वारंवार मागणी केली. जुलै २०१८ मध्ये उपायुक्त डॉ. रसाळ यांनी वाणिज्य केंद्रातील दोन गाळे टपाल कार्यालयासाठी उपलब्ध केले होते.
>‘त्या’ योजनेला मंजुरीही
गतवर्षी सप्टेंबर २०१८ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहनेते परेश ठाकूर यांनीही यासंदर्भात ठराव मांडला होता.
त्या अनुषंगाने ६ मार्च २०१९ ला पनवेल पालिका व टपाल कार्यालय यांच्यात पाच वर्षांसाठी भाडे करार झाला असून सोमवारपासून पनवेलमध्ये टपाल कार्यालय कार्यान्वित झाले
आहे.

Web Title: The new post office in the business complex of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.