शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
4
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
5
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
7
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
8
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
9
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
10
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
12
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
13
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
14
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
15
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
16
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
17
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
19
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
20
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..

नवी मालमत्ता कर आकारणी रखडली; पनवेल महानगरपालिकेचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 12:53 AM

कोरोना आणि अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका

- वैभव गायकरपनवेल : कोरोनामुळे पनवेल महानगरपालिकेची २०१९ ते २०२० सालची नवीन मालमत्ता कर आकारणी रखडली आहे. पालिकेने जीआयएस मॅपिंगद्वारे फेब्रुवारीपर्यंत ९० टक्के संपूर्ण मालमत्तेचे सर्वेक्षण केले होते. मात्र, कोरोनाची साथ, अपुºया मनुष्यबळामुळे पुढील प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.पालिकेच्या स्थापनेला ४ वर्षांचा कालावधी लोटला आहे. चार वर्षांत प्रथमच पालिका क्षेत्रात नवीन करप्रणाली लागू करत असल्याने होणार विरोध लक्षात घेता, पालिकेनेही सध्याच्या घडीला नव्या धोरणानुसार, मालमत्ता कर आकारणीचा विषय बाजूला सारला असून, केवळ कोविडवरच लक्ष केंद्रित केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नगरपरीषदचा भाग, २९ महसुली गावे या व्यतिरिक्त खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आदींचा समावेश आहे. आत्तापर्यंत ३ लाख ७ हजार मालमत्ताचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पालिकेच्या अंदाजानुसार एकूण मालमत्ता कराचा आकडा ३ लाख २० हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ त्यातच कोरोनाची साथ यामुळे ही प्रक्रियाच ठप्प झाली आहे.सध्या खारघरमधील काही भागांचा सर्वेक्षण अपूर्ण आहे. काळुंद्रे भागाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, या ठिकाणी सुमारे १,२०० मालमत्ता आहेत. प्राथमिक स्तरावर पालिकेने येथील नागरिकांकडून हरकती सूचना मागविण्यास सुरुवात केली आहे. कामोठे शहराचे मालमत्ता सर्वेक्षण पूर्ण झाले असून, या ठिकाणी सुमारे ५४ हजार मालमत्ता आहेत. यानुसार, पनवेल महानगरपालिका सर्वेक्षण पूर्ण झालेल्या मालमत्ताधारकांच्या हरकती, सूचना मागविणार आहे.सध्याच्या घडीला सिडको नोडमधून कोणत्याही प्रकारच्या मालमत्ता कराचे उत्पन्न पालिकेला प्राप्त होत नाही. प्रथमच पालिकेमार्फत आकारल्या जाणाºया या करासंदर्भात सिडको नोडमधून विरोध होण्याची शक्यता आहे.वर्षाला १८० कोटींचे उत्पन्न मिळणार?पालिकेला या मालमत्ता कर आकारणीमधून वर्षाला सुमारे १८० कोटींचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. चार टप्प्यांत कर आकारणी होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा १२ मीटरपेक्षा मोठा रस्ता, दुसरा टप्पा १२ मीटरपेक्षा कमी आकाराचा रस्ता, तिसरा टप्पा दाट गावठाणचौथ्या टप्प्यात झोपडपट्टीचा समावेश असणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्याला ४५० ते ५०० रुपये प्रति मीटर आकारणी केली जाण्याची शक्यता आहे. उर्वरित दुसरा, तिसरा आणि चौथ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यापेक्षा अनुक्रमे वीस टक्के कमी कराची आकारणी केली जाणार आहे.पालिकेला तोटा : सर्वेक्षण पूर्ण होऊनही प्रत्यक्षात सन २०१९-२० करिता नवीन कर आकारणी प्रत्यक्षात कोविडच्या अडथळ्यामुळे लागू करता आली नाही. यामुळे नागरिकांना नवे दर लागू होणार नसल्याने, काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, पालिकेचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत मालमत्ता कर असल्याने या कर आकारणीच्या अंमलबजावणी अभावी पालिका तोट्यात जाणार आहे.रहिवाशांमध्ये संभ्रम? : सिडको नोडमधील रहिवासी सिडकोमार्फत पुरविल्या जाणाºया सुविधांसाठी सेवा कर (सर्व्हिस टॅक्स) भरत आहेत. नव्या कर प्रणालीनुसार सिडको नोडमधील रहिवाशांना मालमत्ता कर पालिकेला अदा करावे लागणार असल्याने, सर्व्हिस टॅक्स व्यतिरिक्त मालमत्ता कर भरणे अनिवार्य असल्याने, कर आकारणीबाबत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पालिकेला ही बाब सिडको नोडमधील रहिवाशांना पटवून द्यावी लागणार आहे.अपुरे मनुष्यबळ, कोविडच्या साथीमुळे मालमत्ता कर नवीन प्रणालीद्वारे आकारणीस उशीर झाला आहे. टप्प्याटप्प्याने या कर आकारणीला सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काळुंद्रे येथे सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांकडून या संदर्भात हरकती मागविण्यात आल्या असून, लवकरच पालिका क्षेत्रात सर्वत्र कर आकारणीला सुरुवात केली जाईल.- संजय शिंदे, उपायुक्त,पनवेल महानगरपालिका