नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपानाची पार्टी नको; सुकापूर येथील दे धक्का ग्रुपने साकारला अनोखा देखावा
By वैभव गायकर | Published: December 31, 2023 06:02 PM2023-12-31T18:02:19+5:302023-12-31T18:02:49+5:30
पनवेलमध्ये सिडकोच्या नैना प्रकल्पाबाबत सुरु असलेल्या लढ्याचे चित्रण देखील याठिकाणी साकारले आहे.
पनवेल: सर्वत्र थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरची धामधूम सुरु असताना पनवेल मधील सुकापूर येथील दे धक्का ग्रुपने अनोखा देखावा साकारून मद्यपान न करण्याचा संदेश दिला आहे. तरुणाईला अवाहन करणारा संदेश ड्रंक अँड ड्राईव्ह बाबत जनजागृती केली आहे.
31 डिसेंबरला मद्यपान करुन साजऱ्या केल्या जाणाऱ्या पार्टीमुळे तसेच व्यसनाधिनतेमुळे काय काय दुष्परिणाम होतात, याचा देखावा दे धक्का ग्रुपचे राकेश केणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुकापूर येथे साकारले आहे. दरवर्षी दे धक्का ग्रुप अशाप्रकारे देखावे साकारून जनजागृती करत असतात. या देखाव्यासोबत पनवेलमध्ये सिडकोच्या नैना प्रकल्पाबाबत सुरु असलेल्या लढ्याचे चित्रण देखील याठिकाणी साकारले आहे.
नैना प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांसाठी किती घातक आहे? नैनामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान देखील या देखाव्यात दे धक्का ग्रुपच्या मार्फत सांगण्यात आले आहेत. दरवर्षी नवीन नवीन संकल्पना राबवत आम्ही विविध देखावे साकारत असतो तरुणाई व्यसनाधिनतेकडे ओढली जाऊ नये त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने आम्ही छोटासा प्रयत्न करत असल्याचे राकेश केणी यांनी सांगितले.