नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेल शहरात गुढीपाडव्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी सांस्कृतिक, पारंपरिक कार्यक्रमांबरोबर शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर तरु णांनी नववर्षाचे स्वागत केले. गुढी उभारून ठिकठिकाणी रांगोळी काढून यात्रेचे स्वागत करण्यात आले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्साहात शोभायात्रेत सहभागी झाले होते. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने स्वच्छता, प्लॅस्टिकबंदी आणि मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला राज्यात गुढीपाडवा साजरा केला जातो. या निमित्ताने मराठी नववर्षाचे स्वागत ठिकठिकाणी स्वागतयात्रांच्या माध्यमातून केले जाते. पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, पारंपरिक खेळ आणि प्रात्यक्षिके या शोभायात्रांमधून दाखवली जातात. शहरातील विविध भागांमध्ये अशाप्रकारे शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी संस्कृती जपण्याचा संकल्प केलेल्या नेरुळमधील संकल्प शोभायात्रा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सनईच्या मंगल स्वरात व ढोल-ताशांच्या गजरात नेरुळ डी. वाय. पाटील येथील गजानन महाराज मंदिर ते सेक्टर १५ श्री दत्तमंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून बाबू गेनू मैदानापासून सानपाडा परिसरात स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सीवूड भागात सीवूड रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
नेरु ळ सेक्टर २ मधील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. स्वच्छतेचा सामाजिक संदेश देत महिलांसाठी हळदीकुंकू आणि खेळ मांडियला या कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने वाशी येथे आयोजित केलेल्या स्वागतयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावर्षी आदिवासी बांधवांसोबत गुढीपाडवा साजरा करण्यात आला. पनवेल, चिरनेर, जव्हार, मोखाडा आदी भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी आयोजित स्वागतयात्रेत विविध पारंपरिक नृत्य, खेळ व गाण्यांतून आपल्या संस्कृतीचे नवी मुंबईकरांना दर्शन घडवले. एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या या स्वागतयात्रेची सुरु वात वाशी सेक्टर-१४ येथील गावदेवी मरीआई मंदिरापासून होऊन सांगता वाशीतील शिवाजी चौकात झाली. महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते शिवाजी चौकात गुढी उभारून हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेदेखील उपस्थित होत्या. या कार्यक्र माचे आयोजन नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी केले होते. या कार्यक्र माच्या निमित्ताने स्वच्छता, मतदान जनजागृती तसेच प्लॅस्टिकबंदीबाबत माहितीपत्रकांचे वाटप करून जनजागृती केली.पनवेलमध्ये विशेष आकर्षणच्चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी पनवेलसह खारघर शहरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. मराठी फाउंडेशन खारघर तसेच नववर्ष स्वागत समिती, पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडवा शोभायात्रेत नागरिकांनी पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
च्नववर्ष स्वागत समिती, पनवेलच्या वतीने पनवेल शहरातून १९९९ पासून शोभायात्रा काढली जात जाते. ही शोभायात्रा पनवेल शहरातील व्ही. के. विद्यालयाच्या समोरून सकाळी ६.३० वाजता सुरू झाली. शिवाजी रोड, आदर्श हॉटेल, विरुपाक्ष मंदिर, जय भारत नाका, टिळक रोड यामार्गे मार्गक्र मण करीत या शोभायात्रेचा समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे झाला. खारघर शहरातही मराठी फाउंडेशनच्या वतीने सेक्टर ३४ येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.सीबीडी येथे सार्वजनिक गुढीसीबीडी बेलापूर येथील खान्देश एकता मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील सार्वजनिक गुढी उभारण्यात आली होती. या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे एका खान्देशी व्यक्तीचा सन्मान करण्यात येतो, यावर्षी डॉ. आरती धुमाळ यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला, या वेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्रीराम गोरे, संजय धनगर, मंडळाचे अध्यक्ष हिरामण पाटील, सचिव देवेसिंग राजपूत, खजिनदार सुधाकर पवार, नंदलाल मोरे, दिलीप अहिरे, सतीश देशमुख, विजय पाटील आदी मान्यवर आणि खान्देशी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरणमध्ये शोभायात्राउरणमध्ये ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या वतीने नूतन वर्षानिमित्ताने गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पेन्शनर पार्क येथील उरण नगरपरिषद यांच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शाळा येथून शोभायात्रेस सुरु वात झाली. गणपती चौक, राजपाल नाका, जरीमरी मंदिर, राघोबा मंदिर, राजपाल नाका, गणपती चौक, विमला तलाव, एन. आय. हायस्कूल, पेन्शनर्स पार्कपर्यंत फिरून समारोप झाला. ढोल-ताशा पथकांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता.घणसोलीत पालखी सोहळाआधार ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या निमित्ताने पालखीचे आयोजन करण्यात आले होते. घणसोली येथून सुरू झालेल्या या पालखीची सांगता वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष राजू गावडे, विजय देशमुख, चार्ल्स नाडर, श्रुंखला गावडे, गीता माने, श्रीकांत सातपुते यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आमदार संदीप नाईक, नगरसेविका दीपाली संकपाळ यांनीही पालखीत सहभाग घेऊन मराठी नववर्ष साजरे केले. या सोहळ्यातील महिलांचे ढोल-ताशा पथक आकर्षण ठरले.