नेरूळच्या PFI कार्यालयावर NIA चा छापा; देशभरात कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 22, 2022 11:40 AM2022-09-22T11:40:15+5:302022-09-22T11:40:37+5:30
दहशतवाद्यांना फंडिंग प्रकरणी एनआयए ने काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई - एनआयए ने गुरुवारी सकाळी नेरूळच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. देशभरात हे छापे सुरु असून या संस्थेकडून दहशतवाद्यांना फंडिंग होत असल्याचा संशय आहे.
दहशतवाद्यांना फंडिंग प्रकरणी एनआयए ने काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या माहितीवरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लिम संस्थेकडून दहशतवाद्यांना फंडिंग होत असल्याची माहिती समोर आल्याचे समजते. त्या आधारे पीएफआय च्या देशभरातील कार्यालयांवर छापेमारी सुरु आहे. या संस्थेचे नेरुळ सेक्टर 23 येथे देखील कार्यालय आहे. त्याठिकाणी एनआयए चे गुरुवारी सकाळी छापा टाकला. त्यामध्ये कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. यासाठी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
नवी मुंबई नेरुळ येथील PFI कार्यालयावर NIA ची धाड (फोटो सौजन्य - संदेश रणोसे) #NIApic.twitter.com/SMjTdj5H34
— Lokmat (@lokmat) September 22, 2022