शहरात वाढतेय नायजेरियन डोकेदुखी

By admin | Published: November 10, 2015 01:21 AM2015-11-10T01:21:43+5:302015-11-10T01:21:43+5:30

खारघरमध्ये गुरुवारी नांगोलिया चोंग (२३) या महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. ही महिला मूळची मणिपूरची रहिवासी होती.

Nigerian headaches increasing in the city | शहरात वाढतेय नायजेरियन डोकेदुखी

शहरात वाढतेय नायजेरियन डोकेदुखी

Next

वैभव गायकर, पनवेल
खारघरमध्ये गुरुवारी नांगोलिया चोंग (२३) या महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. ही महिला मूळची मणिपूरची रहिवासी होती. नांगोलिया आपला नायजेरियन प्रियकर उचे उजोग्रा याच्यासोबत कोपरखैरणेत रहात होती. आणि एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी खारघर सेक्टर ३४ मधील सिध्दिविनायक दर्शन या सोसायटीमध्ये आली होती. याठिकाणी तिचा संशयास्पद मृत्यू झाला.
गेल्या वर्ष-दीड वर्षापासून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांची लोकवस्ती वाढत चालली आहे. त्याचा त्रास स्थानिक नागरिकांसह पोलिसांना सहन करावा लागत आहे. आफ्रिका खंडातील नायजेरिया हा गरीब व अविकसनशील देश आहे. स्टुडंन्ट, बिझनेस विजाच्या नावाखाली मुंबई,नवी मुंबई हे नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र यापैकी बरेच जण आॅनलाइन लॉटरी, ड्रग्स, अमली पदार्थांचे सेवन यासारख्या घटनांमध्ये सामील असतात. बनावट पासपोर्ट बाळगणे, विजाची मुदत संपून देखील बेकायदेशीरपणे वास्तव्य करणे अशा घटनांमध्ये नायजेरियन नागरिकांचा मोठा सहभाग आहे.
विशेष म्हणजे अधिक भाडे मिळत असल्याने स्थानिक घरमालक नायजेरियन नागरिकांना घर भाड्याने देत असल्याचेही उघड झाले आहे. ब्रोकरदेखील कमिशनच्या नावाखाली नायजेरियन नागरिकांना रूम मिळवून देत आहेत. बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Nigerian headaches increasing in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.