नेरुळमध्ये आढळला नऊ फूट लांब अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 01:42 AM2019-12-27T01:42:51+5:302019-12-27T01:43:18+5:30
रु ळ सेक्टर ३४ टी एस चाणाक्य युनिव्हर्सिटीमध्ये साप असल्याची माहिती पुनर्वसू
Next
नवी मुंबई : नेरु ळ सेक्टर ३४ टी एस चाणाक्य युनिव्हर्सिटीमध्ये साप असल्याची माहिती पुनर्वसू फाउंडेशनचे सर्पमित्र तनय जुवेकर यांना मिळाली. जुवेकर यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केल्यावर भारतीय सर्पाच्या जातीतील अजगर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अजगरास कोणतीही इजा होऊ न देता सुखरूपरीत्या पकडले. या अजगराची लांबी नऊ फूट होती. नागरिकांच्या मनात असलेली सापांविषयीची भीती व गैरसमज दूर करण्यासाठी जुवेकर यांनी माहिती दिली. त्यानंतर अजगराला पामबीच रोड येथील कांदळवनात सुखरूपरीत्या सोडून देण्यात आले.