नऊ लाखांचे हिरे चोरणारे गजाआड
By admin | Published: August 20, 2015 02:00 AM2015-08-20T02:00:02+5:302015-08-20T02:00:02+5:30
हिरे घडविण्याचा व्यवसाय करणाऱ्याच्या कारखान्यातून ९ लाख किंमतीचे हिरे नोकराच्या मदतीने लंपास करणाऱ्या चोरासह चोरीचे हिरे विकत घेणाऱ्या
मुंबई : हिरे घडविण्याचा व्यवसाय करणाऱ्याच्या कारखान्यातून ९ लाख किंमतीचे हिरे नोकराच्या मदतीने लंपास करणाऱ्या चोरासह चोरीचे हिरे विकत घेणाऱ्या चिंतन सहाला पायधुनी पोलिसांनी अटक केली. ९ लाख किंमतीचे हिरे सहाने अवघ्या ३ लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते.
पायधुनीत सराफ कुमुद मंडल यांचा हिरे घडविण्याचा कारखाना आहे. मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेला सुरोजित कोले याच कारखान्यात फेब्रुवारीत कारागिर म्हणून काम करु लागला. तेव्हा क्रिष्णनंद सिल (२५) याच्याशी त्याची मैत्री झाली. सुरोजितने मंडलकडील हिरे चोरण्याचा कट रचला. १५ मे रोजी कुंडल यांच्याकडे ९ लाख २५ हजार किंमतीचे ३० हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम आले होते. ते हिरे सुरोजितला लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितले. सुरोजित हिरे घेऊन पसार झाला. सुरोजितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक सुनील कुवळेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी क्रिष्णनंदला पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सुरोजितने हिरे क्रिष्णनंदकडे विकण्यास दिले. क्रिष्णनंदने ते हिरे मीरा भार्इंदर परिसरातील चिंतन सहाला ३ लाख २० हजारांना विकले. मिळालेली रक्कम घेऊन सुरोजित गावी पसार झाल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी सहाच्याही बुधवारी मुसक्या आवळल्या. सहाकडून चोरीस गेलेल्या ३० हिऱ्यांपैकी २५ हिरे जप्त करण्यात आले आहे. दोघेही आरोपी कोठडीत असून पसार आरोपी सुरोजितचा शोध सुरु असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)