पाच डझनची हापूसची पहिली पेटी नऊ हजारांना, नवी मुंबई एपीएमसीत आंबा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:58 AM2017-11-29T06:58:27+5:302017-11-29T06:58:41+5:30

दा तीन महिने आधीच ‘फळांचा राजा’ हापूस हा एपीएमसीत दाखल झाला आहे. देवगड हापूस आंब्याच्या पाच डझनाच्या पहिल्या पेटीला तब्बल नऊ हजार रु पयांचा दर मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

 Nine thousand people of five dozen hapus boxes, mangoes in Navi Mumbai APMC | पाच डझनची हापूसची पहिली पेटी नऊ हजारांना, नवी मुंबई एपीएमसीत आंबा दाखल

पाच डझनची हापूसची पहिली पेटी नऊ हजारांना, नवी मुंबई एपीएमसीत आंबा दाखल

Next

नवी मुंबई : यंदा तीन महिने आधीच ‘फळांचा राजा’ हापूस हा एपीएमसीत दाखल झाला आहे. देवगड हापूस आंब्याच्या पाच डझनाच्या पहिल्या पेटीला तब्बल नऊ हजार रु पयांचा दर मिळाल्याची चर्चा रंगली आहे. शनिवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारातील प्रशांत बाळकृष्ण राणे या व्यापाºयाकडे देवगड पडवणी येथील शेतकरी प्रकाश दोंदे-शिर्केकर यांच्या बागेतून हापूसची पाच डझनाची पेटी विक्रीसाठी दाखल झाली. प्रशांत राणे या घाऊक आंबा व्यापाºयाकडे ही पेटी आल्यानंतर तिची विधिवत पूजा करण्यात आली. यंदाचा आंब्याचा हंगाम शेतकरी आणि व्यापाºयांसाठीही चांगला जावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. शिर्केकरांच्या बागेत गेल्या जुलैमध्येच आंबा मोहोर धरला होता. अवकाळी पावसापासून मोहोर वाचवत, शिर्केकरांनी आंब्याचे फळ लवकर घेतले.
यंदा कोकणात पडलेला पाऊस आणि हवामान हे आंब्याच्या पिकासाठी पोषक असल्याचे आंबा उत्पादकांचे म्हणणे आहे. पाऊस व हवामानासोबत शेतकºयांनी देखील ऐन हंगामात आंब्याला लागलेल्या मोहराचे नुकसान होऊ नये म्हणून प्रचंड काळजी घेतली होती. प्रकाश शिर्केकर यांनीही आपल्या बागेतील मोहोर जपण्यासाठी प्रत्येक झाडाला प्लॅस्टिक पिशवीने झाकून मोहोर आणि फळांचे संरक्षण केले. मुंबईतल्या शंभूनाथ जैस्वाल या ग्राहकाने नऊ हजार रुपये मोजून ही पाच डझन देवगड हापूस आंब्याची पेटी खरेदी केली. यंदाच्या मोसमातली देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाली. साधारणपणे आंब्याची पहिली पेटी बाजारात यायला जानेवारी महिना उजाडतो. पण यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच आंबा आल्याने शेतकरी आणि व्यापारी आनंदात आहेत.

पोेषक वातावरण
यंदा हवामान चांगले व आंबा उत्पादनाला पोषक असल्याने आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्वास आंबा उत्पादक व्यक्त करत आहेत.
जानेवारीच्या सुरु वातीला हापूसची आवक बाजारात सुरू होईल, अशी अपेक्षा आंबा व्यापारी प्रशांत राणे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title:  Nine thousand people of five dozen hapus boxes, mangoes in Navi Mumbai APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.