सिंगापूर पोर्टविरोधात निर्धार मोर्चा

By admin | Published: March 28, 2017 06:26 AM2017-03-28T06:26:19+5:302017-03-28T06:26:19+5:30

जेएनपीटीअंतर्गत सुरू होणाऱ्या चौथ्या अर्थात सिंगापूर पोर्टमध्ये जसखार गावाला डावलले जात असल्याच्या निषेधार्थ आणि

Nirmal Morcha against Singapore Port | सिंगापूर पोर्टविरोधात निर्धार मोर्चा

सिंगापूर पोर्टविरोधात निर्धार मोर्चा

Next

उरण : जेएनपीटीअंतर्गत सुरू होणाऱ्या चौथ्या अर्थात सिंगापूर पोर्टमध्ये जसखार गावाला डावलले जात असल्याच्या निषेधार्थ आणि जसखार ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी पोर्टविरोधात सोमवारी निर्धार मोर्चा काढला होता.
न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरच जेएनपीटी माजी ट्रस्टी दिनेश पाटील, कामगार नेते पी. जे. पाटील आणि दामोदर घरत यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घरटी एकास नोकरी आणि जसखार गावाला प्राधान्य न मिळाल्यास ग्रा. पं.च्या हद्दीत प्रस्तावित असलेली सिंगापूर बंदराची कामे बंद पाडण्याचा निर्वाणीचा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.
देशातील जेएनपीटी बंदराची गणना पहिल्या क्रमांकावर केली जाते. जसखार गावाशेजारीच असलेल्या जेएनपीटीअंतर्गत सर्वात मोठ्या लांबीच्या चौथे सिंगापूर बंदर उभारण्याच्या कामाला जोरदार सुरूवात झाली आहे. मात्र सिंगापूर पोर्ट जसखार ग्रा. पं. च्या हद्दीत असूनही त्यांना न्याय हक्कांपासून आणि नोकऱ्यांपासून वंचित ठेवले जात आहेत. त्याशिवाय इतरही विकासाची कामे सुरू आहेत. मात्र तरीही इतर गावांना प्राधान्य देताना जसखार गावाला जाणूनबुजून डावलले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला आहे.
सिंगापूर पोर्टमध्ये नोकरीभरतीमध्ये घरटी एकास नोकरी मिळावी, ग्रामस्थांना विश्वासात घेवूनच आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, सर्व्हिस रोड बनविण्यात यावेत, सिंगापूर पोर्टमधील व्यावसायिक, ठेकेदारीतील कामात जसखार ग्रामस्थांना प्राधान्य मिळावे, नोकरभरतीसाठी शिक्षणाची अट बारावीपर्यंत शिथिल करण्यात यावी, वयाची मर्यादा वाढविण्यात येवून प्रकल्पग्रस्त दाखल्यांऐवजी अवार्ड प्रत जोडण्याची मुभा देण्यात यावी, सर्वच कामगार भरती प्रकल्पग्रस्तांतूनच केली जावी, जसखार ग्रामस्थांच्या मागण्या आणि समस्यांबाबत जेएनपीटी पोर्ट, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आदि विभागाच्या वरिष्ठांसोबत तत्काळ ग्रामस्थांबरोबर बैठक बोलावून योग्य मार्ग काढण्यात यावा आदी मागण्यांसाठी मोर्चा आयोजित केला होता. या वेळी सिंगापूर पोर्ट अधिकारी कॅप्टन धवल, प्रशासकीय अधिकारी अवधूत सावंत यांनी ठोस आश्वासन देण्यास चालढकलपणा करताच संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. (वार्ताहर)

Web Title: Nirmal Morcha against Singapore Port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.