देश जोडणारे स्थिर, मजबूत सरकारला निवडून द्या- नितीन बानगुडे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:34 AM2019-04-25T00:34:22+5:302019-04-25T00:36:19+5:30
श्रीरंग बारणे यांच्यासाठी दापोडीत सभा
पिंपरी : देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची घोषणा काँग्रेस सरकारच्या जाहीरनाम्यात आहे, असे देश तोडणारे सरकार निवडून देणे धोकादायक आहे. देशात मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून द्यावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
महायुतीची सभा दापोडीतील नरवीर तानाजी पुतळा चौक येथे झाली. या वेळी खासदार आणि शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, चंद्रकांता सोनकांबळे, संजय काटे, तुषार नवले, परशुराम वाडेकर, गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, ऊर्मिला काळभोर, सरिता साने, आशा शेंडगे आदी उपस्थित होते.
बानगुडे पाटील म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकार काळात दर आठवड्याला एक घोटाळा बाहेर पडायचा या युती सरकारमध्ये दर आठवड्याला एक लोककल्याणकारी योजना राबविली. पन्नास वर्षे सैनिकांचे हात बांधून ठेवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. सैन्याचे शौर्य असूनदेखील त्यांना दाखविता आले नाही. युती सरकारने पाच वर्षात सर्जिकल, एअर स्ट्राइक करून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी ही निवडणूक असून, सुरक्षिततेसाठी कणखर व कठोर निर्णय घेणारे सरकार हवे आहे.’’ रवींद्र मिर्लेकर म्हणाले, ‘‘विरोधी उमेदवाराची बारणे यांच्यासोबत तुलनाच होऊ शकत नाही.’’
बोपखेल येथे पदयात्रा काढली. पदयात्रेची सुरुवात गावातील ग्रामदैवताचे दर्शनाने झाली. या वेळी नगरसेविका हिराबाई ऊर्फ नानी घुले, दक्षता समिती सदस्य रवींद्र कोवे, लक्ष्मण घुले, सुरेश घुले, मंगला घुले, प्रतीक्षा घुले, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, कृष्णा वाळके, माऊली गायकवाड, माऊली वाळके, शिक्षण मंडळ माजी सभापती चेतन घुले उपस्थित होते. बारणे यांनी बोपखेलमधील पंचशील बुद्ध विहारास भेट देऊन तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीला अभिवादन केले.
पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळा कदम, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका ऊर्मिला काळभोर, सरिता साने, कामगार नेते इरफान सय्यद, सल्लागार मधुकर बाबर, पिंपरी विधानसभाप्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत कोºहाळे, महिला आघाडीच्या माजी संघटिका सुनीता चव्हाण, माजी शहरप्रमुख रामगिरी गोसावी, माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांनी बैठक घेतली.