नवी मुंबई : शहरात स्वच्छता अभियान राबवून देशात नावलौकिक कमविणाऱ्या नवी मुंबई शहरातील अडगळीच्या भागात स्वच्छता करण्यास महापालिकेला विसर पडला असून डेब्रिज, गवत वाढल्याने नागरी वस्तींमध्ये सापांचा वावर वाढला आहे. ऊन पडू लागल्याने अडगळीच्या ठिकाणी दृष्टीस पडणारे साप आता नागरी वस्ती, तसेच पालिकेच्या वास्तूंमध्ये देखील प्रवेश करू लागले आहेत. सानपाडा येथे झोपडपट्टी भागात राहणाºया ३६ वर्षीय एका महिलेला विषारी नाग चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, महापालिकेने शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छता करावी अशी मागणी केली जात आहे.
केंद्र शासनामार्फत देशात राबविण्यात येणाºया स्वच्छ भारत मिशन कार्यक्र माअंतर्गत २0१७ साली शहराचा देशात आठवा तर राज्यात पहिला क्र मांक पटकाविला होता. शहरात स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. परंतु शहरात वाढलेले गवत, पडलेले डेब्रिज अशा ठिकाणी उंदरांच्या शोधात सापांचा वावर वाढला आहे. सध्या पडत असलेल्या उन्हामुळे साप जवळ असलेल्या नागरी वस्ती आणि पालिकांच्या वास्तूंमध्ये शिरू लागले आहेत. नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी डोंगराळ, खाडी भाग आहे. सीबीडी, सीवूड, नेरु ळ, जुईनगर, सानपाडा आदी भागात पावसाळ्यात डोंगरावरून वाहणारे पावसाचे पाणी आणि एमआयडीसीचे सांडपाणी वाहून नेणारे मोठे नाले देखील आहेत. पालिकेचे मलनि:सारण केंद्र, महापालिकेच्या जलकुंभांचे आवार, नाले परिसरात झुडपे वाढली असून गवत देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात सीबीडी सेक्टर ४ मधील महापालिकेच्या वाचनालयाच्या आवारात दोन नाग आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. या वाचनालयाच्या मागे पावसाळी नाला असून या नाल्याच्या भोवती मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. पालिकेच्या शिरवणे येथील नागरी आरोग्य केंद्राच्या आवारात देखील नुकतीच साप पकडण्याची घटना घडली आहे. या नागरी आरोग्य केंद्राच्या शेजारी रेल्वे लाइन असून या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. सानपाडा सेक्टर २0 मधील मलनि:सारण केंद्रासमोरील झोपडपट्टी भागात राहणाºया सेहजानबीबी कमल शेख या ३६ वर्षीय महिलेला बुधवारी (ता.२६) विषारी नाग चावल्याची घटना घडली आहे. नागाच्या दंशानंतर अवघ्या काही वेळात या महिलेचा मृत्यू झाला आहे.पालिका वास्तूंच्या आवारात अडगळनवी मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण केंद्र, जलकुंभ, शाळा, विभाग कार्यालये, वाचनालय, नागरी आरोग्य केंद्र यामधील अनेक वास्तू, नाले, खाडी, डेब्रिज पडलेले ओस भूखंड आदींच्या शेजारील वास्तूंच्या भोवती महापालिकेचे पडलेले भंगार साहित्य, अतिक्र मण विभागाने जप्त केलेले साहित्य, भंगार वाहने, वाढलेली झुडपे आणि गवत यामुळे देखील अडगळ निर्माण झाली आहे.