साथीच्या रोगांवर महापालिकेच्या उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 03:07 AM2016-07-07T03:07:03+5:302016-07-07T03:07:03+5:30
पावसाळ्यात डोके वर काढणाऱ्या साथीच्या रोगांचा अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. याअंतर्गत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई : पावसाळ्यात डोके वर काढणाऱ्या साथीच्या रोगांचा अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. याअंतर्गत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर डासांचे उत्पत्ती स्थळ असलेल्या जवळपास ४0 हजार ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे.त्यातील ३२0 डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहे.
पावसाळ्यात साधारण जून महिन्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे हिवताप, डेंग्यू आदी साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी १६,८६२ पत्रके आणि ८५00 पोस्टर्सचे वाटप करण्यात आले आहे.
तसेच जनजागृतीसाठी विविध ठिकाणी ७३ शिबिरे घेण्यात आली आहेत, तर साथीच्या रोगाचे निदान करण्यासाठी २९१0 जणांचे रक्त
नमुने तपासण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)