नवी मुंबई : भारत सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने देशातील विविध शहरातील शहर वाहतूक प्रकल्पाबाबत नाविन्यपूर्ण विविध बाबी राबविणाऱ्या शहरांना पुरस्कार वितरीत करण्यात येणार असल्याबाबत जाहीर केले होते. यामधील परिवहन सुधारणेत पुढाकार घेणाºया या वर्गवारीतील पुरस्कारासाठी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्र माच्या वतीने नामांकन सादर करण्यात आले होते. त्याला अनुसरून एनएमएमटीला सर्वोत्तम संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.नवी मुंबई महापालिकेच्या पर्यावरणयुक्त इलेक्ट्रीक बसेस, प्रवाशांच्या मार्गदर्शन व हितार्थ कार्यिन्वत करण्यात आलेली एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणाली, पीआयएस प्रणाली, मोबाईल एॅप, महिला प्रवाशांना देण्यात येणाºया प्राधान्यार्थ महिलांसाठी तेजिस्वनी बसेस तसेच महापालिकेमार्फत सुरू करण्यात आलेली सार्वजनिक सायकल सामायिकरण आदी मुद्दयांचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार गठित केलेल्या निवड समितीने नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमास या वर्गवारीतील पुरस्कारासाठी पात्र ठरविले.भारत सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने देशातील विविध शहरातील शहर वाहतूक प्रकल्पाबाबत इंदिरा गांधी प्रतिष्ठान, लखनौ, उत्तरप्रदेश येथे आयोजित ‘‘नागरी गतीमान भारत चर्चासत्र व प्रदर्शन २०१९’’ या कार्यक्रमात १७ नोव्हेंबर २०१९ रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, नगरविकास मंत्री अशितोष टंडन, नगरविकास मंत्रालय भारत सरकारचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एमएमएमटीच्यावतीने परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनेश नलावडे यांनी पुरस्कार स्वीकारला. यासाठी महापौर जयवंत सुतार व आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मार्गदर्शन केले.
एनएमएमटीला सर्वोत्तम संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार, उत्तम सेवेसाठी गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 2:54 AM