एनएमएमटी चालकास मारहाण, कार चालकाची अरेरावी : कडक कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:50 AM2018-01-23T02:50:50+5:302018-01-23T02:51:10+5:30
सानपाडा येथे एनएमएमटी चालकास मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : सानपाडा येथे एनएमएमटी चालकास मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घणसोली आगाराची बस एपीएमसीकडून सानपाडाच्या दिशेने येत असताना एक व्यक्तीने कार रोडवर उभी करून फोनवरून बोलण्यास सुरवात केली होती. यामुळे बसला पुढे जाण्यास अडथळा निर्माण होवू लागला होता. कार बाजूला केली जात नसल्याने बस चालकाने खाली उतरून कार बाजूला घेण्यास सांगितले. यामुळे संतापलेल्या कार चालकाने बसचालकाला मारहाण केली.
एनएमएमटी चालकास मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा आम्ही निषेध करत असून अशाप्रकारे हल्ला करणाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी.
- सुधीर पवार, परिवहन सदस्य, काँगे्रस