एनएमएमटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:52 AM2019-03-12T00:52:24+5:302019-03-12T00:52:34+5:30

तिजोरीमध्ये खडखडाट; नियोजनशून्य कामकाजाविषयी नाराजी

NMMT employees salary hike | एनएमएमटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

एनएमएमटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

Next

नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमातील (एनएमएमटी) अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा रखडले आहे. उपक्रमाच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. वेळेत वेतन देण्यासाठीचे नियोजन करण्यात प्रशासनाला अपयश आले असून कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने २०१९ - २० या आर्थिक वर्षासाठी विक्रमी ४०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. पालिकेच्या परिवहन उपक्रमासाठी १४० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. पालिका प्रत्येक वर्षी एनएमएमटीचे अनुदान वाढवत आहे. पण त्यानंतरही उपक्रमाचे कामकाज पूर्वपदावर येत नाही. प्रत्येक वर्षी तोटा वाढतच चालला असून कर्मचाºयांचे वेतनही वेळेवर करता येत नाही.

२०१४ पर्यंत प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला कर्मचाºयांना वेतन दिले जात होते. परंतु त्यानंतर वेळेचे गणित वारंवार चुकू लागले आहे. सर्व कर्मचाºयांना एकाच तारखेला वेतन देता येत नाही. ७ ते १० तारखेपर्यंत कधीही वेतन दिले जात आहे. मार्च महिन्याची ११ तारीख झाल्यानंतरही अद्याप अधिकारी व कर्मचाºयांना वेतन देण्यात आलेले नाही. अनेक कर्मचाºयांनी घरासाठी व इतर कारणांसाठी बँकांचे कर्ज घेतले आहे. १० तारखेला कर्जाचा हप्ता भरणे आवश्यक असते. वेळेत पगार झाला नसल्यामुळे अनेकांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अनेकांना महिन्याचे अत्यावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठीही पैसे उधारी मागण्याची वेळ आली आहे.

परिवहनमध्ये वेतन उशिरा मिळण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. याशिवाय अधिकारी व कर्मचाºयांच्या रजा उशिरा मंजूर केल्या जातात. यामुळे अनेकांना कमी वेतन मिळते. कमी वेतन मिळालेल्या कर्मचाºयांना पुरवणी वेतन दोन ते तीन महिन्यानंतर दिले जाते. हे प्रकार थांबविण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

एनएमएमटीमधील कर्मचाºयांना २०१४ पर्यंत वेळेत वेतन मिळत होते. त्यानंतर विलंबाचे प्रकार होवू लागले असून यामुळे कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
- शहाजी शिंदे,
संयुक्त सरचिटणीस- कर्मचारी सेना
अधिकारी व कर्मचाºयांचे वेतन वेळेवर होणे आवश्यक आहे. वेळेत वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाºयांच्या आर्थिक अडचणी वाढत असून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- समीर बागवान, परिवहन सदस्य

अर्थसंकल्प व इतर कारणांनी वेतन देण्यास विलंब झाला होता. चालकांचे वेतन दिले असून कर्मचाºयांना मंगळवारी वेतन दिले जाईल.
- निलेश नलावडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, एनएमएमटी

Web Title: NMMT employees salary hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.