शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

एनएमएमटीची भाडेवाढ

By admin | Published: June 09, 2015 1:14 AM

परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरही विविध कारणांमुळे मागील वर्षभरापासून रखडलेल्या एनएमएमटीच्या भाडेवाढीबाबत व्यवस्थापनाने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत.

नवी मुंबई : परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरही विविध कारणांमुळे मागील वर्षभरापासून रखडलेल्या एनएमएमटीच्या भाडेवाढीबाबत व्यवस्थापनाने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. पुढील आठवडाभरात संबंधित विभागाकडून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यवस्थापनाने वर्तविली आहे. ही मंजुरी मिळताच तातडीने भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. अपुरा कर्मचारीवर्ग व नियोजनशून्य कारभारामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाला (एनएमएमटी) दरमहा सुमारे अडीच कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन व्यवस्थापनाने गेल्या वर्षी तिकीट दरात वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते. परिवहन प्राधिकरणाने लोकसभा निवडणुकी अगोदर त्याला मंजुरी दिली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच दुसऱ्या दिवसापासून ही भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता. मात्र विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ स्थगित ठेवण्यात आली होती. आता महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे मागील दीड वर्षापासून रखडलेली भाडेवाढ करणे क्रमप्राप्त झाले आहे. परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सध्या डिझेलवर चालणाऱ्या १४५ बस, २ मिनी बस, वातानुकूलित व्होल्वो ३० आणि सीएनजीवर चालणाऱ्या १६१ अशा एकूण ३३८ बसेस आहेत. यापूर्वी २५ सप्टेंबर २०१२ रोजी तिकीट दरात वाढ केली होती. त्यामुळे भाडेवाढीच्या जुन्या प्रस्तावाला नव्याने मंजुरी मिळावी यासाठी व्यवस्थापनाने प्रयत्न चालविले आहेत. (प्रतिनिधी)मागील दीड-दोन वर्षांत इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे तिकिटांचे दर वाढविणे अपरिहार्य झाले आहे. भाडेवाढीचा नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. असे असले तरी विविध स्तरावर मंजुरी मिळविण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडे पडून असलेल्या भाडेवाढीच्या जुन्याच प्रस्तावाला मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठवडाभरात त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे. -शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, परिवहन उपक्रम