एनएमएमटीला प्रतिमहिना तीन कोटी तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:39 AM2018-09-25T03:39:01+5:302018-09-25T03:39:14+5:30

महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. डिझेलच्या दरामध्ये होत असलेली वाढ, अवैध प्रवासी वाहतूक व खड्ड्यांमुळे उपक्रमाला मोठा फटका बसत असून प्रत्येक महिन्याला जवळपास तीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

 NMMT has lost three crore rupees per month | एनएमएमटीला प्रतिमहिना तीन कोटी तोटा

एनएमएमटीला प्रतिमहिना तीन कोटी तोटा

Next

- योगेश पिंगळे
नवी मुंबई -  महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. डिझेलच्या दरामध्ये होत असलेली वाढ, अवैध प्रवासी वाहतूक व खड्ड्यांमुळे उपक्रमाला मोठा फटका बसत असून प्रत्येक महिन्याला जवळपास तीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई परिवहन उपक्र म सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई शहरासह, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, पनवेल, उरण आदी भागात एनएमएमटीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. प्रवाशांसाठी सुविधा देणारा नवी मुंबई परिवहन उपक्र म गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यातच आहे. पालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे हे नवी मुंबईत येण्यापूर्वी या बस सुमारे प्रति किलोमीटर ४३ रु पये तोट्यात होत्या. परिवहन उपक्र मात मुंढे यांनी आयटीएस प्रणाली, ई तिकिटिंग, सतत गैरहजार राहणाऱ्या कर्मचाºयांवर कारवाई, तोट्यात असणारे बस मार्ग बंद करणे असे विविध बदल केल्यामुळे या बस १८ रु पये तोट्यापर्यंत पोहचल्या होत्या. त्यानंतर हेच तोट्याचे प्रमाण कमी होऊन प्रत्येक किलोमीटरमागे सुमारे १२ रु पयांपर्यंत आले होते. गेल्या सहा महिन्यापासून डिझेलच्या दरात लिटरमागे सुमारे २0 रु पये वाढले आहेत. एनएमएमटी बस चालविण्यासाठी दर दिवसाला २५ हजार लिटर डिझेलची गरज लागते. डिझेलचे दर वाढल्याने दिवसाला ५ लाख रु पये तर महिन्याला दीड कोटी रु पये डिझेलसाठी अतिरिक्त खर्च वाढला आहे. परिवहन सेवेत आस्थापनेवर काम करणाºया कर्मचाºयांना ३ टक्के तर ठोक मानधन, रोजंदारी पद्धतीने काम करणाºया कर्मचाºयांना देखील काही प्रमाणावर दरवर्षी जुलै महिन्यात वेतनवाढ देण्यात आली.वेतनवाढ झाल्याने हा खर्च सुमारे ५0 लाख रु पयांनी वाढला आहे. शाळा सुरू झाल्यावर दरवर्षी जून महिन्यात एनएमएमटीच्या उत्पन्नात ५ ते ७ टक्क्यांनी वाढ होते. म्हणजेच दरवर्षी सुमारे ७0 लाख रु पयांनी उत्पन्न वाढते.
नवी मुंबईमधून कल्याण, उरण, मुंबईकडे खाजगी वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्याचा मोठा फटका एनएमएमटीला बसत आहे. खड्ड्यांमुळे बसेस वेळेत पोहचत नाहीत. यामुळे अनेक फेºया रद्द कराव्या लागत आहेत. यामुळे पावसाळ्यापुर्वीपेक्षा ५0 लाख उत्पन्न कमी होत आहे. महिन्याला एक कोटी वीस लाख रु पयांचा तोटा होत आहे. एकूण दरमहिन्याला सुमारे ३ कोटी रु पयांचा तोटा नवी मुंबई परिवहन सेवेला होत आहे. परिवहन सेवेला जून महिन्याआधी होणाºया तोट्याच्या तुलनेत सध्या होणारा आर्थिक तोटा दुप्पट झाला आहे.

सहा महिन्यापासून डिझेलचे दर लिटरमागे सुमारे २0 रु पयांपर्यंत वाढले आहेत. त्याचबरोबर अवैध वाहतूक, वाढलेल्या रिक्षा, खड्ड्यांमुळे बसचे होणारे नुकसान यामुळे जून महिन्यापासून तोट्यात वाढ झाली आहे.
- शिरीष आरदवाड,
परिवहन व्यवस्थापक

नवी मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील मार्ग
पनवेल महापालिका क्षेत्रात एनएमएमटीचे २६ मार्ग सुरू असून विविध मार्गांवर १२३ बस धावतात
उरण नगरपरिषद क्षेत्रात एनएमएमटीचे ३ मार्ग सुरू असून विविध मार्गांवर ४0 बस धावतात
बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात एनएमएमटीचा १ मार्ग सुरू असून या मार्गावर ५ बस धावतात

खड्ड्यांमधील मार्ग
सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली, कोपरा, खारघर, सीबीडी, उरण फाटा, शिरवणे फाटा, तुर्भे नाका, सानपाडा, वाशी गाव.
डोंबिवली, शिळफाटा
बामन डोंगरी, किल्ले गावठाण, वहाळ, तरघर, उरण, गव्हाण फाटा, द्रोणागिरी
मुंब्रा बायपासचे काम सुरू असल्याने ऐरोली टोलनाका, दिवा सर्कल, रबाळे
ठाणे, कळवा, कल्याण पत्री पूल
पनवेल भागातील करंजाडे, नेरे, पनवेल शहर, तळोजा
मुंबई भागातील पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरीवली दरम्यान मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्याची रु ंदी कमी करण्यात आल्याने होणारी वाहतूककोंडी

एकूण बस ४५२
मार्ग
७0
सीएनजी बस ११0
डिझेल बस ३४२

Web Title:  NMMT has lost three crore rupees per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.