शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

एनएमएमटीला प्रतिमहिना तीन कोटी तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:39 AM

महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. डिझेलच्या दरामध्ये होत असलेली वाढ, अवैध प्रवासी वाहतूक व खड्ड्यांमुळे उपक्रमाला मोठा फटका बसत असून प्रत्येक महिन्याला जवळपास तीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई -  महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. डिझेलच्या दरामध्ये होत असलेली वाढ, अवैध प्रवासी वाहतूक व खड्ड्यांमुळे उपक्रमाला मोठा फटका बसत असून प्रत्येक महिन्याला जवळपास तीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई परिवहन उपक्र म सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई शहरासह, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, पनवेल, उरण आदी भागात एनएमएमटीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. प्रवाशांसाठी सुविधा देणारा नवी मुंबई परिवहन उपक्र म गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यातच आहे. पालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे हे नवी मुंबईत येण्यापूर्वी या बस सुमारे प्रति किलोमीटर ४३ रु पये तोट्यात होत्या. परिवहन उपक्र मात मुंढे यांनी आयटीएस प्रणाली, ई तिकिटिंग, सतत गैरहजार राहणाऱ्या कर्मचाºयांवर कारवाई, तोट्यात असणारे बस मार्ग बंद करणे असे विविध बदल केल्यामुळे या बस १८ रु पये तोट्यापर्यंत पोहचल्या होत्या. त्यानंतर हेच तोट्याचे प्रमाण कमी होऊन प्रत्येक किलोमीटरमागे सुमारे १२ रु पयांपर्यंत आले होते. गेल्या सहा महिन्यापासून डिझेलच्या दरात लिटरमागे सुमारे २0 रु पये वाढले आहेत. एनएमएमटी बस चालविण्यासाठी दर दिवसाला २५ हजार लिटर डिझेलची गरज लागते. डिझेलचे दर वाढल्याने दिवसाला ५ लाख रु पये तर महिन्याला दीड कोटी रु पये डिझेलसाठी अतिरिक्त खर्च वाढला आहे. परिवहन सेवेत आस्थापनेवर काम करणाºया कर्मचाºयांना ३ टक्के तर ठोक मानधन, रोजंदारी पद्धतीने काम करणाºया कर्मचाºयांना देखील काही प्रमाणावर दरवर्षी जुलै महिन्यात वेतनवाढ देण्यात आली.वेतनवाढ झाल्याने हा खर्च सुमारे ५0 लाख रु पयांनी वाढला आहे. शाळा सुरू झाल्यावर दरवर्षी जून महिन्यात एनएमएमटीच्या उत्पन्नात ५ ते ७ टक्क्यांनी वाढ होते. म्हणजेच दरवर्षी सुमारे ७0 लाख रु पयांनी उत्पन्न वाढते.नवी मुंबईमधून कल्याण, उरण, मुंबईकडे खाजगी वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्याचा मोठा फटका एनएमएमटीला बसत आहे. खड्ड्यांमुळे बसेस वेळेत पोहचत नाहीत. यामुळे अनेक फेºया रद्द कराव्या लागत आहेत. यामुळे पावसाळ्यापुर्वीपेक्षा ५0 लाख उत्पन्न कमी होत आहे. महिन्याला एक कोटी वीस लाख रु पयांचा तोटा होत आहे. एकूण दरमहिन्याला सुमारे ३ कोटी रु पयांचा तोटा नवी मुंबई परिवहन सेवेला होत आहे. परिवहन सेवेला जून महिन्याआधी होणाºया तोट्याच्या तुलनेत सध्या होणारा आर्थिक तोटा दुप्पट झाला आहे.सहा महिन्यापासून डिझेलचे दर लिटरमागे सुमारे २0 रु पयांपर्यंत वाढले आहेत. त्याचबरोबर अवैध वाहतूक, वाढलेल्या रिक्षा, खड्ड्यांमुळे बसचे होणारे नुकसान यामुळे जून महिन्यापासून तोट्यात वाढ झाली आहे.- शिरीष आरदवाड,परिवहन व्यवस्थापकनवी मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील मार्गपनवेल महापालिका क्षेत्रात एनएमएमटीचे २६ मार्ग सुरू असून विविध मार्गांवर १२३ बस धावतातउरण नगरपरिषद क्षेत्रात एनएमएमटीचे ३ मार्ग सुरू असून विविध मार्गांवर ४0 बस धावतातबदलापूर नगरपरिषद क्षेत्रात एनएमएमटीचा १ मार्ग सुरू असून या मार्गावर ५ बस धावतातखड्ड्यांमधील मार्गसायन-पनवेल महामार्गावर कळंबोली, कोपरा, खारघर, सीबीडी, उरण फाटा, शिरवणे फाटा, तुर्भे नाका, सानपाडा, वाशी गाव.डोंबिवली, शिळफाटाबामन डोंगरी, किल्ले गावठाण, वहाळ, तरघर, उरण, गव्हाण फाटा, द्रोणागिरीमुंब्रा बायपासचे काम सुरू असल्याने ऐरोली टोलनाका, दिवा सर्कल, रबाळेठाणे, कळवा, कल्याण पत्री पूलपनवेल भागातील करंजाडे, नेरे, पनवेल शहर, तळोजामुंबई भागातील पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरीवली दरम्यान मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्याची रु ंदी कमी करण्यात आल्याने होणारी वाहतूककोंडीएकूण बस ४५२मार्ग७0सीएनजी बस ११0डिझेल बस ३४२

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाnewsबातम्या