शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

कोविड रुग्णांच्या सेवेसाठी शहरात धावली एनएमएमटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 12:56 AM

लूट थांबून सामान्यांना मिळाला न्याय

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई शहरात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यावर काही दिवसांत रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले. रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने शहरातील महापालिका आणि खासगी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हत्या. तसेच काही खासगी रुग्णवाहिका चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून सामान्य रुग्णांची लूट करत असल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त होत होत्या. त्यानंतर कोविड रुग्णांच्या सेवेसाठी महापालिकेने परिवहन उपक्रमाच्या एनएमएमटीच्या मिनी बसेस उपयोगात आणत नागरिकांची लूट थांबवली तसेच मोफत सेवा देऊन नागरिकांना मोठा दिलासा दिला.नवी मुंबई शहरात १३ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित आढळून आला होता. त्यानंतर शहरात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. रुग्णांना उपचार देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कोविड सेंटर्स उभारण्यात येत होते. खासगी रुग्णालयांमधील बेड जवळपास फुल्ल झाले होते. रुग्णांचे प्रमाण वाढल्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी शहरातील खासगी आणि महापालिकेच्या रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नव्हत्या. रुग्णांचा नाइलाज असल्याने अनेक खासगी रुग्णवाहिका चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून आर्थिक लूट करत होते. याबाबत महापालिकेकडे तक्रारी आल्यावर तसेच रुग्णवाहिका कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांना सुविधा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेची रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र, सिडको एक्सिबेशन सेंटर, कोविड सेंटर, पनवेलमधील इंडिया बुल्स, शहरातील सोसायट्यांमध्ये होणारे टेस्टिंग कॅम्प आदी ठिकाणी महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या मिनी एनएमएमटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना सुमारे ५८हून अधिक बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे इतर रुग्णवाहिकांवरील ताण कमी झाल्याने ज्या रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज आहे त्या रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ लागल्या. खासगी रुग्णवाहिका चालकांनी मनमानी भाडे आकारून रुग्णांची लूट न करण्याच्या सूचना महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०२० पासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यावर कोविड सेंटर्स बंद करण्यात आले होते तसेच ॲम्ब्युलन्स म्हणून वापरण्यात येणाऱ्या एनएमएमटी बसेसची संख्या  कमी करण्यात आली होती. मात्र फेब्रुवारीपासून नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढू लागला असून, बंद केलेले कोविड सेंटर्स आवश्यकतेनुसार पुन्हा सुरू केले जात आहेत. तसेच कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये तसेच कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना घरी पोहोचविण्यासाठी एनएमएमटी बसेसमध्येदेखील आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येत आहे. सध्या शहरातील कोविड सेंटर, तपासणी केंद्रात एनएमएमटीच्या सुमारे २८ मिनी बसेस सेवा देत आहेत.एनएमएमटी कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटीनवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमातील ॲम्बुलन्स म्हणून सेवा देणाऱ्या बसवर दोन शिफ्टमध्ये एनएमएमटीचे चालक काम करत आहेत. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानात एनएनएमटीच्या वाहकांनीदेखील कामे केली असून, महापालिकेने तयार केलेल्या विशेष पथकांमध्येदेखील काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एनएमएमटीच्या कॉम्पुटर ऑपरेटर कर्मचाऱ्यांना  कोविड सेंटर, नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कोविडसंदर्भात डाटा इंट्री, सुपरव्हिजन आदी कामे देण्यात आली आहेत.कोविड काळात एनएमएमटीने ॲम्ब्युलन्स, बस चालक आणि इतर कर्मचारी उपलब्ध करून दिले. ज्या कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे ते कुठल्याही शंका उपस्थित न करता आपल्या जबाबदाऱ्या पार पडत आहेत. कोविड काळात सेवा देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तरीदेखील एनएमएमटीचे कर्मचारी अविरतपणे सेवा देत आहेत.- अभिजित बांगर, (आयुक्त, न.मुं.म.पा.)

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका