कळंबोली : पनवेल परिसरात एनएमएमटीच्या बसेस धावत आहेत. या मार्गावर दोन्ही बाजूने थांब्यावर बस थांबतात, त्या थांब्यावर सद्य परिस्थितीत कोणताही आडोसा नाही. यामुळेच प्रवाशांना ऊन, वारा, पावसात बसची वाट पाहत ताटकळत राहावे लागत आहे. तसेच गैरसोयही होते. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या असताना त्याची दखल एनएमएमटीने घेतली आहे. या सर्व जागेवर शेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पनवेल महापालिकेनेही परवानगी देऊन आपली जबाबदारी पूर्ण केली आहे.
नवी मुंबईला लागून पनवेल तालुका आहे. येथे सिडकोने शहरांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये खारघर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, नावडे, तळोजाचा समावेश आहे. आतमध्ये प्रवास करण्याकरिता रिक्षा शिवाय दुसरे साधन नव्हते; परंतु आता जिकडे-तिकडे एनएमएमटीच्या बसच दिसू लागल्या आहेत. प्रवाशांची कमी पैशात ते वाहतूक करीत असल्या कारणाने आता बसमध्ये गर्दी जास्त दिसून येते. पनवेल रेल्वे स्थानकातून करंजाडे, साईनगर, खांदेश्वर असा बसेस जातात आणि येतात. मानसरोवर रोडपाली ही सेवाही सुरू आहे. हायकल कंपनी ते सीबीडी रेल्वेस्थानक, कळंबोली-उरण तसेच खारघर रेल्वे स्थानकाहून कॉलनीत बस धावतात. तसेच इतर मार्गावरही बससेवा सुरू आहेत. पनवेल महापालिकेची जी हद्द आहे तिथे एनएमएमटी बस प्रवासी वाहतूक करतात. दररोज हजारो प्रवासी या बसमधून जा-ये करतात. या प्रवाशांची संख्या वाढत चालली असताना आणखी काही मार्गांवर एनएमएमटी गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.बसथांब्यावर निवारा शेडच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी एनएमएमटी परिवहन समितीकडे अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे एनएमएमटीने या सर्व थांब्यावर शेड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे हालचाली सुरू झाल्याचे एनएमएमटीकडून सांगण्यात आले.बसथांबे शेडची मागणीच्पनवेल परिसरात ४३७ पेक्षा जास्त बसथांबे आहेत. ते सर्व उघड्यावर असल्या कारणाने प्रवाशांना उन्हात, पावसात आणि वाऱ्यात बसची वाट पाहत थांबावे लागते. यापासून त्याचे संरक्षण व्हावे, याकरिता बसथांब्यावर शेड बांधण्याची मागणी सुरू होती. पनवेल महानगरपालिकेने अखेर शेड उभारण्यात परवानगी दिली आहे.एनएमएमटी बसथांबेबसचा मार्ग बसथांबेखारघर (शहर) ६३खारघर ते तळोजा ९०रोडपाली ४६कामोठे २४नवीन पनवेल ४८पनवेल शहर १६६एकूण ४३७एनएमएमटी बसथांबे
बसचा मार्ग बसथांबेखारघर (शहर) ६३खारघर ते तळोजा ९०रोडपाली ४६कामोठे २४नवीन पनवेल ४८पनवेल शहर १६६एकूण ४३७