एकही सीएफएस बंद पडणार नाही
By admin | Published: January 9, 2017 06:29 AM2017-01-09T06:29:37+5:302017-01-09T06:29:37+5:30
केंद्र सरकारच्या डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार
उरण : केंद्र सरकारच्या डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार असल्याच्या विरोधकांच्या खोट्या, चुकीच्या प्रचाराला कामगारांनी बळी पडू नये, असे आवाहन करतानाच चौथे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर सीएफएस बरोबराच रोजगाराच्या संख्येतही मोठी वाढ होणार असल्याचे रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले.
कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना चोख उत्तर देण्यासाठी उरण तालुका भाजपच्या वतीने रविवारी कामगार मेळाव्याचे आयोजन के ले होते. जेएनपीटी कागगार वसाहतीमधील मल्टीपरपज हॉलमध्ये आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कामगार मेळाव्याप्रसंगी जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, कामगार नेते सुधीर घरत, सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, शहर अध्यक्ष कौशिक शहा, महेश कडू, भाजपाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध कामगार संघटनांचे कामगार सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही समावेश होता.
विकासाचे दर वाढविण्याचे काम भाजपा करीत आहे. कंपन्यांचा विकास, पुनर्विकास, पर्यावरण पूरक आणि समतोल विकास आणि सर्वांच्या हाताला काम अशी भूमिका केंद्र आणि राज्यात भाजपा बजावीत आहे. त्यामुळे डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार असल्याचे विरोधकांचा खोट्या, चुकीया प्रचाराला कामगारांनी बळी पडू नये, असे आवाहन चौथे बंदर कार्यान्वित झाज्यानंतर सीएफएसबरोबरच रोजगाराच्या संख्येतही मोठी वाढ होणार असल्याचे खडेबोल रामशेठ ठाकूर यांनी विरोधकांना सुनावले. सत्तेत असलेल्या मित्रपक्ष शिवसेना आणि जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांच्या सरकारविरोधी भूमिकेवर बालदी यांनी टीका केली.
(वार्ताहर)