शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये ‘नो हेल्मेट नो एंट्री’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:46 AM2018-11-14T02:46:02+5:302018-11-14T02:46:30+5:30
रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून, अपघात टाळण्यासाठी दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरणे गरजेचे असताना हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नवी मुंबई : शासकीय अथवा खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या तसेच कामानिमित्त येणाºया दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. हेल्मेट नसल्यास कार्यालयाच्या आवारात प्रवेश मिळणार नसून, दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी उपक्र म राबविला असून नागरिकांनी या उपक्र माचे स्वागत केले आहे.
रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून, अपघात टाळण्यासाठी दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरणे गरजेचे असताना हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुचाकी चालकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी हा उपक्र म राबविण्यास सुरु वात केली असून, शहरातील शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, मॉल, कंपन्या, महाविद्यालये आदी ठिकाणी प्रवेशद्वारावर हा उपक्र म राबविला जाणार आहे. वाहतूक पोलिसांनी या बाबत संबंधित कंपन्या, कार्यालये, महाविद्यालये यांना पत्र दिले असून वाहतूक पोलिसांच्या या उपक्र माला संबंधितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात काम करणाºया आणि कामानिमित्त येणाºया दुचाकीचालकांना हेल्मेट शिवाय प्रवेश देऊ नये, अशी विनंती करणारे पत्र सीवूड वाहतूक पोलिसांनी पालिका आयुक्तांना दिले होते, त्यानुसार सोमवारी १२ नोव्हेंबरपासून मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुचाकीस्वारांसाठी वाहतूक पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली होती. हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांना १४ नोव्हेंबरपासून वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सीवूड वाहतूक पोलिसांमार्फत पालिका मुख्यालय परिसरात सदरची मोहीम आठ दिवस घेण्यात येणार असून, सुरक्षारक्षकांनाही याबाबत सूचना देण्यात आल्याचे सीवूड वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी सांगितले.