शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

शहरात उद्यान ठेकेदाराकडून दंडवसुली नाही, नवी मुंबईत कामे झाल्याचे दाखवून बिलांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 11:56 PM

Navi Mumbai : शहरात उद्यान, दुभाजाकामधील ट्री बेल्ट, मोकळ्या जागेवर विकसित केलेली हिरवळ मिळू २८० ठिकाणे आहेत. जवळपास ११ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर हिरवळ आहे.

-   नामदेव मोरे

नवी मुंबई : उद्यान विभागातील घोटाळ्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच ठेकेदाराला पाठीशी घातल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. कामे वेळेत न केल्यास दंड आकारण्याची तरतूद असतानाही उद्यान विभागाने ठेकेदाराला दंड आकारणी केली नाही व बिलांच्या फाइल मंजूर केल्या आहेत. यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान झाले आहे.नवी मुंबईमधील सर्वात अनागोंधी कारभार उद्यान विभागामध्ये सुरू आहे. शहरात उद्यान, दुभाजाकामधील ट्री बेल्ट, मोकळ्या जागेवर विकसित केलेली हिरवळ मिळू २८० ठिकाणे आहेत. जवळपास ११ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर हिरवळ आहे. शहरातील उद्यानांची देखभाल, दुरुस्ती हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी योग्य पद्धतीने देखभालीच्या कामाकडे लक्ष देत नाहीत. ठेकेदाराने कामचुकारपणा केला, तरी त्याला पाठीशी घालतात. याविषयी लोकप्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली होती. एक महिन्यापूर्वी उद्यान विभागामध्ये ८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केल्यानंतर, आयुक्त अभिजीत बांगर यांनी चौकशीचे आदेश दिले व धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

अतिरिक्त बिले मंजूर करुन घेतलीठेकेदाराने सादर केलेल्या बिलांमध्ये प्रथमदर्शनी त्रुटी आढळून येत नव्हत्या. सर्व कामे केल्याचे दाखविण्यात आले होते. आयुक्तांनी दोन पथके तयार करून प्रत्यक्षात उद्यानांना भेटी दिल्यानंतर, कामे झालेली नसताना ती झाली असल्याचे सांगून अतिरिक्त बिले मंजूर करून घेतली असल्याचे समोर आहे. ठेकेदाराला कार्यादेश देताना व्यवस्थित काम न केल्यासदंड आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दंड आकारण्याची स्पष्ट तरतूद निविदेमधील अटी व शर्तीमध्येही कोणत्या कामासाठी किती दंड आकारला जाणार, याचा स्पष्ट उल्लेखही आहे. वेळेत उद्यान उघडले व बंद केले नाही, तर प्रतिदिन २ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. हिरवळीची देखभाल करणे, वृक्षांची देखभाल, संरक्षण भिंतीची देखभाल, जॉगिंग ट्रॅक ॲम्फिथिएटर व इतर गोष्टींच्या वेळेत देखभाल न केल्यास दंड आकारण्याची स्पष्ट तरतूद केली आहे. मात्र, मनपाच्या उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराकडून दंड वसूल केलाच नाही. 

निष्काळजीपणासाठी दंडाची तरतूद प्रकार    दंडवेळेवर उद्यान चालू व बंद न केल्यास    २ हजारस्वच्छता व कचरा व्यवस्थापन    २ हजारलॉन व वृक्षांना पाणी देणे     २ हजारलॉनची देखभाल                         ३ हजारझुडपांची देखभाल                           ५ हजारमोठ्या झाडांची देखभाल                      ७ हजारमातीचा थर टाकणे                  २५ रुपये प्रती चौ.मी.उद्यानातील साहित्याची देखभाल        २ हजारटॉय ट्रेन देखभाल                      २ हजारशिल्प व इतर देखभाल     २ हजाररस्ते दुभाजकांमधील झुडपांची देखभाल       २ हजारखतनिर्मिती                                      ५ हजारराजहंस व बदकांची देखभाल                    २ हजारसंरक्षण भिंत दुरुस्ती                        १,५०० ते २ हजारजॉगिंग ट्रॅक                                   १,५००सिंचन व्यवस्था                          १,५००गजेबो                                         ७ हजारबैठक व्यवस्था                                   १ हजार ते ७ हजारॲम्पिथिएटर                                         ७ हजारवॉटर फाउंटेन                            २ हजारप्रसाधानगृह, पंपहाउस, वॉचमेन केबिन     १ हजार ते ७ हजारएंट्रन्स प्लाझा                                 १ हजारपार्किंग विभाग                                     १ हजारविद्युत व्यवस्था                                  १,५००

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई