महापालिका शाळेतील फुटबॉलपटूंना येणार अच्छे दिन, ३० खेळाडूंची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:21 AM2019-03-22T04:21:57+5:302019-03-22T04:22:09+5:30

नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या पुढाकाराने पालिकेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा फुटबॉल संघ तयार करण्याचे काम सुरू आहे.

Nomination school footballers will be selected for the good day, 30 players selected | महापालिका शाळेतील फुटबॉलपटूंना येणार अच्छे दिन, ३० खेळाडूंची निवड

महापालिका शाळेतील फुटबॉलपटूंना येणार अच्छे दिन, ३० खेळाडूंची निवड

Next

- योगेश पिंगळे
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या पुढाकाराने पालिकेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा फुटबॉल संघ तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे पालिका शाळेत शिकणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना अच्छे दिन येणार आहेत. यासाठी चाचणी घेऊन ३० खेळाडूंची निवडही केली आहे.
नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियमवर १७ वर्षांखालील ‘फिफा’ वर्ल्डकपचे सामने पार पडले. या वेळी यजमान शहर म्हणून नवी मुंबई महापालिकेला मान मिळाला होता. या सामन्यांसाठी खेळाडूंना सराव करता यावा, यासाठी महापालिकेच्या नेरु ळ सेक्टर १९ येथील यशवंतराव चव्हाण मैदानात फुटबॉलसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्यात आले आहे. फुटबॉलसाठी तयार करण्यात आलेल्या मैदानाचे अनेक फुटबॉल क्रीडा संस्था, संघ सामन्यांसाठी, सरावासाठी बुकिंग करतात. महापालिकेकडे फुटबॉल मैदानाची सुविधा असल्याने महापालिका शाळांत शिकणाºया विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता यावा आणि पालिका शाळेत शिकणाºया गरीब कुटुंबातील होतकरू खेळाडूंनाही संधी मिळावी, यासाठी महापालिका फुटबॉल संघ बनविणार आहे. यासाठी महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधून खेळाडूंची यादी मागविण्यात आली होती, यामध्ये १२ शाळांमधून २२६ विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाली होती. आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अभिषेक यादव यांच्या मार्गदर्शनाने या खेळाडूंची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. चाचणीमध्ये ७७ खेळाडू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. १६ मार्च रोजी नेरु ळमधील फुटबॉल मैदानात अंतिम चाचणी घेऊन ३० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून, सराव करण्यासाठी नेरु ळ येथे ये-जा करण्यासाठी एनएमएमटी बसची सुविधा आणि आवश्यक फुटबॉल साहित्यदेखील देण्यात येणार आहे.

विद्यार्थिनींनाही संधी
महापालिकेच्या माध्यमातून प्राथमिक शाळांमधील मुलींचा संघही तयार करण्यात येणार आहे. यासाठी काही शाळांमधील विद्यार्थिनींची चाचणी घेण्यात आली आहे.

महापालिकेने फुटबॉल खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान बनविले आहे. खासगी शाळा, संस्था या मैदानाचा पुरेपूर लाभ घेत आहेत. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनाही संधी उपलब्ध व्हावी, त्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून असा उपक्र म पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. याचा फायदा खेळाडूंना होणार आहे.
- नितीन काळे, उपायुक्त, क्र ीडा विभाग

Web Title: Nomination school footballers will be selected for the good day, 30 players selected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.