वर्गीकरण न के ल्यास कचरा उचलणार नाही : पनवेल आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:55 AM2017-11-16T01:55:28+5:302017-11-16T01:55:41+5:30

पालिका हद्दीत ज्या सोसायट्यांमधून १०० किलोपेक्षा जास्त कचरा निघत असेल अशा सोसायट्या कचºयाचे वर्गीकरण करत नसतील तर १ डिसेंबरला पालिका हद्दीतील सिडको नोडमधील देखील कचरा उचलला जाणार नाही.

 Non-classification will not raise garbage: Panvel Commissioner | वर्गीकरण न के ल्यास कचरा उचलणार नाही : पनवेल आयुक्त

वर्गीकरण न के ल्यास कचरा उचलणार नाही : पनवेल आयुक्त

Next

पनवेल : पालिका हद्दीत ज्या सोसायट्यांमधून १०० किलोपेक्षा जास्त कचरा निघत असेल अशा सोसायट्या कचºयाचे वर्गीकरण करत नसतील तर १ डिसेंबरला पालिका हद्दीतील सिडको नोडमधील देखील कचरा उचलला जाणार नाही. विशेष म्हणजे कचºयाचे वर्गीकरण करण्यासंदर्भात ज्या सोसायट्या उत्तम कामगिरी बजावतील अशा सोसायट्यांना स्पर्धेत सहभागी करून त्यांना मालमत्ता करात सूट दिली जाईल, असे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यावेळी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापन तसेच स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७ संदर्भात महत्त्वाची बैठक बुधवारी आद्यक्र ांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयुक्त, महापौर, सभागृह नेते, सभापती, पालिका हद्दीतील रहिवासी, शिक्षक यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी २०१७ च्या स्वच्छ भारत सर्वेक्षणासंदर्भात माहिती आयुक्तांनी उपस्थितांना दिली. १८ नोव्हेंबरला पार पडणाºया महासभेत सत्ताधाºयांनी यासंदर्भात चर्चा करावी असे सांगताच सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती अमर पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, बाविस्कर यांनी विरोधकांना आम्ही कचºयाच्या विषयासंदर्भात बोलत असल्याचे सांगत तुम्ही आम्हाला शिकवू नका असे सांगताच शेकाप नगरसेवक पापा पटेल, हरेश केणी, प्रमोद भगत यांनी सत्ताधात्तयांना धारेवर धरण्यास सुरु वात केली. विशेष म्हणजे नागरिकांच्या उपस्थितीत सत्ताधारी- विरोधक सभागृह सुरू असल्याप्रमाणे भांडत बसल्याने शेवटी आयुक्तांनी मध्यस्थी करत सत्ताधारी भाजपा नगरसेवकांना सुनावले. तुम्हाला कोणत्याही विषयावर बोलायचे असल्यास माझ्याशी कार्यालयात येऊन वैयक्तिक बोला असे सांगत असताना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. आम्ही त्यांच्याच प्रश्नावर बोलत असल्याचे सांगितले.
यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारु शीला घरत, आरोग्य समिती सभापती डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेवक हरेश केणी, गुरु नाथ गायकर उपस्थित होते.
नगरसेवकांची अनुपस्थिती
पनवेल महानगर पालिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या या सभेत प्लॅस्टिक पिशव्या बंदी, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत सर्वेक्षण या विषयावर चर्चा झाली. मात्र ८३ पैकी केवळ २० नगरसेवक या बैठकीला उपस्थित राहिल्याने अनेकांना हा कार्यक्रम महत्त्वाचा वाटला नसल्याचे दिसून आले. खारघरमधील १३ पैकी केवळ दोन नगरसेवक या कार्यक्र माला उपस्थित होते.

Web Title:  Non-classification will not raise garbage: Panvel Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.