सुशिक्षितच नाही, सुसंस्कृत झाले पाहिजे - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 11:43 PM2019-11-09T23:43:06+5:302019-11-09T23:43:17+5:30

माझी सद्गुरू वामनराव पै यांच्याशी भेट एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी झाली.

Not just educated, must be cultured - Gadkari | सुशिक्षितच नाही, सुसंस्कृत झाले पाहिजे - गडकरी

सुशिक्षितच नाही, सुसंस्कृत झाले पाहिजे - गडकरी

Next

नवी मुंबई : दिव्यस्मरण महोत्सव प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, समाजाने फक्त सुशिक्षित होऊन उपयोगी नाही तर सुसंस्कृतही झाले पाहिजे. माझी सद्गुरू वामनराव पै यांच्याशी भेट एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी झाली. त्यांचा प्रत्येक शब्द हृदयात साठविण्यासारखा होता. ज्या गोष्टींची जिज्ञासा होती त्याचे समाधान विचार ऐकून झाले, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या, अशी जीवनविद्या मिशनची सद्गुरू वामनराव पै यांनी व्याख्या केली आहे. विचारांना विवेकाची जोड देण्याचे काम जीवनविद्या मिशनच्या वतीने सुरू असून, समाजाने विज्ञानाची कास धरून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमणा करावी, असे आवाहन प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै यांनी घणसोलीमध्ये केले आहे.

सद्गुरू वामनराव पै यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त घणसोलीमध्ये ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान दिव्यस्मरण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी प्रल्हाद पै, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. पै यांनी ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात आणि राष्ट्रहितात’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सद्गुरूंनी समाजाला वास्तववादाकडे नेले. आदर्शवाद व दैववादाकडे नेले नाही. प्रयत्नाचे महत्त्व पटवून दिले. विकासवादाचा मार्ग दाखविला. विचारांची आणि विज्ञानाची कास धरून चांगले शिक्षण दिले. सद्गुरूंनी जगाला दोन संकल्प दिले. जग सुखी व्हावे, राष्ट्र सर्वांगाने प्रगतिपथावर जावे, असे व्हिजन दिल्याचे सांगितले. या वेळी सुरेश हावरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Not just educated, must be cultured - Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.