शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सुशिक्षितच नाही, सुसंस्कृत झाले पाहिजे - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 11:43 PM

माझी सद्गुरू वामनराव पै यांच्याशी भेट एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी झाली.

नवी मुंबई : दिव्यस्मरण महोत्सव प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, समाजाने फक्त सुशिक्षित होऊन उपयोगी नाही तर सुसंस्कृतही झाले पाहिजे. माझी सद्गुरू वामनराव पै यांच्याशी भेट एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी झाली. त्यांचा प्रत्येक शब्द हृदयात साठविण्यासारखा होता. ज्या गोष्टींची जिज्ञासा होती त्याचे समाधान विचार ऐकून झाले, असे मतही त्यांनी व्यक्त केले.वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या, अशी जीवनविद्या मिशनची सद्गुरू वामनराव पै यांनी व्याख्या केली आहे. विचारांना विवेकाची जोड देण्याचे काम जीवनविद्या मिशनच्या वतीने सुरू असून, समाजाने विज्ञानाची कास धरून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमणा करावी, असे आवाहन प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै यांनी घणसोलीमध्ये केले आहे.सद्गुरू वामनराव पै यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त घणसोलीमध्ये ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान दिव्यस्मरण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी प्रल्हाद पै, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. पै यांनी ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात आणि राष्ट्रहितात’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सद्गुरूंनी समाजाला वास्तववादाकडे नेले. आदर्शवाद व दैववादाकडे नेले नाही. प्रयत्नाचे महत्त्व पटवून दिले. विकासवादाचा मार्ग दाखविला. विचारांची आणि विज्ञानाची कास धरून चांगले शिक्षण दिले. सद्गुरूंनी जगाला दोन संकल्प दिले. जग सुखी व्हावे, राष्ट्र सर्वांगाने प्रगतिपथावर जावे, असे व्हिजन दिल्याचे सांगितले. या वेळी सुरेश हावरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी