कृपाशंकर सिंग यांच्या मुलाला नोटीस
By admin | Published: May 24, 2015 02:04 AM2015-05-24T02:04:20+5:302015-05-24T02:04:20+5:30
कारर्टर रोड येथील ७४० चौ. फुटांच्या घराचे कर्ज थकवल्याने एका खाजगी बँकेने कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्र व पत्नी यांना नोटीस बजावली आहे.
मुंबई : कारर्टर रोड येथील ७४० चौ. फुटांच्या घराचे कर्ज थकवल्याने एका खाजगी बँकेने कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्र व पत्नी यांना नोटीस बजावली आहे. बँकेने या घराचा प्रातिनिधिक ताबाही घेतला आहे. बँकेचे कर्ज आम्ही थकवलेले नाही, असे नरेंद्र याने सांगितले आहे.
येथील ओशियानिक इमारतीत हे घर आहे. या घराची विक्री करण्यात येणार होती. आता विक्री रद्द करण्यात आली आहे. अचानक बँकेने ५७.८७ लाखांच्या थकबाकीची नोटीस नरेंद्र व त्याच्या आईला पाठवली. यामुळे नरेंद्र थक्क झाले आहेत. बँकेचे कर्ज आम्ही ४५ दिवसांत फेडले आहे. सुरुवातीच्या काळात कर्जाचे काही हफ्ते थकले होते, पण नंतर ते फेडण्यात आले, असे नरेंद यांनी सांगितले. या घरासाठी नरेंद्र यांना प्रति चौ.फूट एक लाख रुपये अपेक्षित होते. त्यानुसार त्यांना तब्बल सात कोटी रुपये त्यांना मिळाले असते. पण नंतर घराची विक्री थांबवण्यात आली. (प्रतिनिधी)