बाजार समिती पाठविणार व्यापाऱ्यास नोटीस
By admin | Published: November 18, 2015 01:20 AM2015-11-18T01:20:42+5:302015-11-18T01:20:42+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये दिवाळीदिवशी आग लागली होती. संबंधित व्यापाऱ्याने विनापरवाना बदाम फोडण्याचा यंत्राचा वापर केल्यामुळे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये दिवाळीदिवशी आग लागली होती. संबंधित व्यापाऱ्याने विनापरवाना बदाम फोडण्याचा यंत्राचा वापर केल्यामुळे व शेड टाकल्यामुळे ही घटना घडली असून प्रशासन संबंधिताला कारवाईची नोटीस पाठविणार आहे.
मसाला मार्केटमधील जी विंगमध्ये दिवाळीदिवशीच आग लागली होती. गाळ्यावर अनधिकृतपणे बांधलेले शेड व छतावर ठेवलेली बदाम फोडण्याची यंत्रे जळून गेली होती. अग्निशमन दलाने तत्काळ उपाययोजना केल्यामुळे आग वेळेत नियंत्रणात आणता आली होती. ज्या गाळ्यामध्ये आग लागली तो मूळ मालकाने भाड्याने दिला होता. या ठिकाणी गाळ्यात व छतावर बदाम फोडण्याची यंत्रे बसविली होती. यासाठी पालिकेची व बाजारसमितीची परवानगी घेतली नव्हती. छतावरही यंत्रे बसविली होती. फटाक्यामुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. परंतु छतावरील यंत्रामुळे शॉर्टसर्किट होवून ही घटना घडल्याचेही बोलले जात आहे. बाजार समितीमध्ये फक्त कृषी मालाचा व्यापार करता येतो. बदाम फोडण्याचा व्यवसाय करण्यास परवानगी दिलेली नाही. या घटनेची गंभीर दखल बाजार समिती प्रशासनाने घेतली असून संबंधित व्यापाऱ्यास कारवाई करण्याची नोटीस दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)