महापालिकेचे आता व्यावसायिक संघ, राज्यातील पहिला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:36 PM2018-10-25T23:36:11+5:302018-10-25T23:36:15+5:30

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कबड्डी, खो-खो, शूटिंग बॉल खेळाचे व्यावसायिक संघ निर्माण केले असून, संघातील खेळाडूंची अंतिम निवड लवकरच केली जाणार आहे.

Now the professional team of the municipal corporation, the first experiment in the state | महापालिकेचे आता व्यावसायिक संघ, राज्यातील पहिला प्रयोग

महापालिकेचे आता व्यावसायिक संघ, राज्यातील पहिला प्रयोग

Next

- योगेश पिंगळे
नवी मुंबई : खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कबड्डी, खो-खो, शूटिंग बॉल खेळाचे व्यावसायिक संघ निर्माण केले असून, संघातील खेळाडूंची अंतिम निवड लवकरच केली जाणार आहे. व्यावसायिक संघ निर्माण करणारी नवी मुंबई राज्यातील पहिलीच महापालिका ठरणार आहे.
क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट खेळ खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना आर्थिक परिस्थितीमुळे खेळापासून दूर राहावे लागते. या खेळाडूंना वाव मिळावा, यासाठी महापालिकांनी खेळाडू दत्तक घेऊन खेळाच्या सुविधा निर्माण करणे, कार्यशाळा भरविणे, प्रशिक्षण देणे, स्पर्धांचे आयोजन करणे, खेळाडूंना बक्षिसांचे वाटप करणे आदी कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा निर्णय आहे. शहरातील जास्तीत जास्त खेळाडूंना वाव मिळावा आणि क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कबड्डी, खो-खो, शूटिंग बॉल खेळाचे व्यावसायिक संघ निर्माण करण्यात आले आहेत. व्यावसायिक संघांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे. संघांमध्ये निवड होणाºया खेळाडूंना प्रति महिना १५ हजार रु पये मानधन मिळणार असून, ११ महिन्यांचा करार केला जाणार आहे. क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे या क्षेत्रापासून दूर राहणाºया खेळाडूंना पालिकेमार्फत मिळणारे मानधन यामुळे आधार मिळणार आहे. या तिन्ही खेळांच्या निवड प्रक्रि येसाठी नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील खेळाडूंनी हजेरी लावली होती. यामध्ये कबड्डीसाठी ३७, खो-खोसाठी ३० आणि शूटिंग बॉलसाठी १७ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामधील कबड्डीसाठी १२ खळाडूंची प्राथमिक निवड झाली असून, सहा खेळाडू प्रतीक्षायादीमध्ये आहेत.
खो-खोसाठी १२ खळाडूंची प्राथमिक निवड झाली असून, सहा खेळाडू प्रतीक्षायादीमध्ये आहेत आणि शूटिंग बॉलसाठी सात खळाडूंची प्राथमिक निवड झाली असून, तीन खेळाडू प्रतीक्षायादीमध्ये आहेत. यामध्ये ८० टक्के शहतील खेळाडूंचा सहभाग आहे. क्रीडा समितीने या खेळाडूंची प्राथमिक चाचणी घेऊन त्यानुसार निवड केली आहे. खेळाडूंची अंतिम निवड समितीच्या बैठकीत मंजुरीनंतर पालिका आयुक्त याबाबत महासभेत प्रस्ताव मांडणार आहेत.
>क्र ीडा समितीच्या माध्यमातून बनविण्यात आलेले संघ विविध खेळांमध्ये महापालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध होणार असून, चांगल्या खेळामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार असून ते नवी मुंबई शहराचे नावदेखील उंचावतील.
- मुनावर पटेल,
सभापती, क्र ीडा समिती
>खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून व्यावसायिक संघ बनविण्यासाठी गेल्या वर्षभरात पाठपुरावा केला होता. आता खेळाडूंची अंतिम निवड होत असून, या संघांच्या माध्यमातून शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
- विशाल डोळस,
नगरसेवक,
अध्यक्ष ‘अ’ प्रभाग समिती

Web Title: Now the professional team of the municipal corporation, the first experiment in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.