आता नवी मुंबईतच घ्या बालाजीचे दर्शन; मुख्यमंत्र्यांना विश्वास,  मंदिराचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 06:41 AM2023-06-08T06:41:58+5:302023-06-08T06:43:33+5:30

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत केल्यानंतर शिंदे बोलत होते.

now visit balaji in navi mumbai faith to the chief minister bhoomi pujan of the temple | आता नवी मुंबईतच घ्या बालाजीचे दर्शन; मुख्यमंत्र्यांना विश्वास,  मंदिराचे भूमिपूजन

आता नवी मुंबईतच घ्या बालाजीचे दर्शन; मुख्यमंत्र्यांना विश्वास,  मंदिराचे भूमिपूजन

googlenewsNext

लोकमत न्यू ज नेटवर्क, पनवेल : नवी मुंबईतील उलवे येथे साकारण्यात येत असलेले बालाजी मंदिर हे राज्यातील भाविकांचे नवे तीर्थस्थळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला. उलवे, सेक्टर १२ येथे दहा एकर परिसरात हे मंदिर साकारण्यात येत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या श्री. वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत केल्यानंतर शिंदे बोलत होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेश बालदी, मंदाताई म्हात्रे, रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, तिरुमला देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी, रामशेठ ठाकूर, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सिडकोचे सहसंचालक कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

सर्व सहकार्य करू

प्रत्येकाला आंध्र प्रदेश राज्यात जाऊन तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य होत नाही. अशा भाविकांना राज्यात या ठिकाणी तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. हे मंदिर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तिरुमला ट्रस्टचे अध्यक्ष रेड्डी यांनी या मंदिराच्या साकारण्याविषयीची थोडक्यात माहिती दिली.


 

Web Title: now visit balaji in navi mumbai faith to the chief minister bhoomi pujan of the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.